‘त्रिसूत्री’द्वारे शेतकºयांना सक्षम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:26 AM2017-07-31T01:26:37+5:302017-07-31T01:27:23+5:30
राज्यातील शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतमालालाच ई-मार्केट संकल्पनेत आणून राज्यभर ५२ शीतगृहांची शृंखला निर्माण करण्यात येत असून, वीज, पाणी व बाजारपेठ या त्रिसूत्रीद्वारे शेतकºयांना सक्षम करण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
लासलगाव : राज्यातील शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतमालालाच ई-मार्केट संकल्पनेत आणून राज्यभर ५२ शीतगृहांची शृंखला निर्माण करण्यात येत असून, वीज, पाणी व बाजारपेठ या त्रिसूत्रीद्वारे शेतकºयांना सक्षम करण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दरम्यान, नार-पार खोºयातून गिरणा खोºयात १० टीएमसीपेक्षा अधिक पाणी आणण्यात येणार असून, पार खोºयातून गोदावरी खोºयात आणल्या जाणाºया पाण्यापैकी ३ टीएमसी पाणी पालखेड समूहात येणार असल्याने त्याचा लाभ चांदवड, येवला व सिन्नरला होणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. लासलगाव येथील रेल्वेस्थानक परिसरात खरेदी-विक्री संघाच्या प्रांगणात रविवारी दुपारी दोन वाजता पाच कोटी रुपये खर्चाच्या देशातील पहिल्या बहुद्देशीय कांदा शीतगृहाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल, सौ. प्रभू, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार स्नेहलता कोल्हे, सीमा हिरे, कंटेनर्स कॉर्पोरेशन ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष व्ही. कल्याण रामा, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. के. यादव उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यभर रेल्वेचे चांगले जाळे निर्माण झाले तर शेतमालाची ने-आण करण्यासाठी त्याचा फायदा शेतकºयांना होईल. रेल्वेमार्ग होण्यासाठी पन्नास टक्के खर्चही शासन करीत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. देशात उभारण्यात येणाºया २२७ पैकी ५२ शीतगृहे महाराष्टÑात उभारली जात आहेत. त्यापैकी २५ आता पूर्ण होतील व उर्वरितही लवकरच पूर्ण करण्यात येतील असे सांगून फडणवीस यांनी शीतगृहांसाठी वीजदर कमी करण्याचेदेखील शासनाच्या विचाराधिन असल्याचे सांगितले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी यावेळी कामायनी एक्स्प्रेसला लासलगाव येथे जाताना व येतानाचा थांबा देण्याची घोषणा केली. व्ही. कल्याण रामा यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली. शेतकरी कर्ज माफीचा निर्णय घेतल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह रेल्वेमंत्री प्रभू तसेच उपस्थित मंत्री महोदयांचा गांधी टोपी व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकपर भाषणात लासलगाव खरेदी-विक्र ी संघाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी लासलगाव विभाग खरेदी विक्र ी संघाच्या सामंजस्य करारानुसार रेल्वेच्या कंटेनर्स कार्पोरेशन ट्रान्सपोर्ट यांच्या तर्फे देशात प्रथमच २५०० मेट्रीक टन क्षमतेचे हे बहुद्देशीय शीतगृह बांधण्यात येणार असुन खरेदी-विक्र ी संघाने यासाठी जागाही उपलब्ध करून दिली आहे . या शीतगृहात १२५० मेट्रिक टन जागा कांदा या पिकाकरीता राखीव ठेवण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. सुत्रसंचलन प्रा. भास्कर ढोके यांनी तर आभार यादव यांनी मानले.
टोमॅटो केचअप प्रक्रिया उद्योगासाठी जपानसोबत करार
गेल्या दोन वर्षांत शेतमालाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. ग्रेप नेटच्या माध्यमातून ३० हजार द्राक्षबागांची नोंदणी झाली असून, द्राक्ष निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. अनार नेट आणि मॅँगो नेटच्या माध्यमातून डाळींब आणि आंब्याच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. टोमॅटो केचअप प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी जपानी कंपनीसोबत करार करण्यात आला असून, त्यामुळे शेतकºयांच्या उत्पादनाला हमीभाव मिळून दराच्या चढ-उताराचा त्यावर परिणाम होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शीतगृहाचे काम वर्षभरात पूर्ण होणार : सुरेश प्रभू
रेल्वे खाते व कृषी विभाग यांचा फारसा संबंध आलेला नसला तरी शेतकºयांच्या उत्पादित मालाची साठवणूक झाली तर त्याचा त्यांना थेट फायदा होईल. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दि. ३ जून रोजी विचार मांडताच रेल्वेमंत्री म्हणून आपण लगेचच भारतीय रेल्वेच्या माध्यमातून लासलगाव येथे पाच कोटी रुपये खर्चाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेले शीतगृह उभारण्याचा निर्णय घेतला. हे काम वर्षभरात पूर्णत्वास जाईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
शेतकºयांची घोषणाबाजी
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाप्रसंगी येवला येथील संतूपाटील झांबरे यांच्यासह चार-पाच शेतकºयांनी कृषी कर्जमाफीबद्दल घोषणाबाजी केल्यामुळे सभेत पाच-दहा मिनिटे गोंधळ उडाला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून जोरदार टोलेबाजी करीत मीडियाचे लक्ष जावे व आपली छबी वाहिन्यांवर झळकावी यासाठी हा प्रकार केला जात आहे. ही स्टंटबाजी आहे. अशा लोकांकडे दुर्लक्ष करावे व टाळ्या वाजवून या अपप्रवृत्तीला विरोध करा, असे सांगताच उपस्थितांनी साथ दिली.
नैताळेत गांधीगिरी
नैताळे येथील शेतकºयांनी सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेचा गांधीगिरीने अनोखा निषेध केला. त्यासाठी निमित्त शोधले मुख्यमंत्र्यांच्या लासलगाव येथील दौºयाचे. नैताळेच्या शेतकºयांनी व व्यावसायिकांनी नैताळे गाव बंद ठेवून चुकीच्या कर्जमाफीचा निषेध नोंदविला; शिवाय मुख्यमंत्री नैताळे येथून गेल्यानंतर नाशिक-औरंगाबाद महामार्गावर शेतकºयांनी पंचामृत व दूध शिंपडले आणि पाण्याने हा रस्ता धुऊन गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदवला.