शेती कर्जाचे लक्ष्य हजार कोटींनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:39 AM2018-05-14T00:39:47+5:302018-05-14T00:39:47+5:30

The target of agricultural credit decreased by thousands of crores | शेती कर्जाचे लक्ष्य हजार कोटींनी घटले

शेती कर्जाचे लक्ष्य हजार कोटींनी घटले

Next

नाशिक : दुष्काळ आणि नापिकीसारख्या दुष्टचक्रात सापडलेला शेतकरी सातत्याने घसरणाऱ्या बाजारभावामुळे जेरीला आलेला असताना, आता पुन्हा खरिपाची तयारी करू लागला आहे. परंतु ऐन खरिपाच्या  तोंडावर भांडवलाची गरज असताना, जिल्हा बँकेने कर्जपुरवठ्याच्या निर्धारित  लक्ष्यामध्ये सुमारे एक हजार कोटींची कपात केली आहे.  गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा बँकेतून दीड हजार कोटींहून अधिक पीककर्जाची उचल झालेली असताना, जिल्हा बँकेने यावर्षी केवळ ५०० कोटींचे लक्ष्य ठेवून शेतकºयांच्या कर्जपुरवठ्यावर मर्यादा आणली असून, लक्ष्यच कमी ठेवल्याने कर्जाची परतफेड करूनही नव्याने कर्ज मिळेल की नाही, या साशंकतेने शेतकºयांकडून मागील थकीत कर्जाचा भरणा होण्याची शक्यताही कमी झाली आहे.  खरिपाच्या हंगामात अनेक शेतकरी जिल्हा बँकेचे तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून घेतलेले पीककर्ज जुने-नवे करून कर्ज खाते नियमित करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी अनेकदा शेतकरी उसनवार अथवा नातेवाइकांकडून मदत मिळवून बँकेचे मुद्दल व व्याज भरून पुन्हा नव्याने कर्ज मिळाल्यानंतर त्याची परतफेड व वाढवून मिळालेल्या कर्जात खरिपाचा हंगाम कसाबसा भागविण्याचा प्रयत्न करतात. परंतु यावर्षी जिल्हा बँके ने कर्जपुरवठ्याचे निर्धारित लक्ष्यच अत्यल्प ठेवले आहे. त्यामुळे शेतकºयांनी कर्जाचा भरणा केल्यानंतरही त्यांना नव्याने कर्ज मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने शेतकरी थकीत कर्ज भरण्यास तयार होण्याची शक्यता घटली आहे. गेल्या वर्षीही अनेक शेतकºयांना कर्जाची परतफेड करूनही खरीप हंगामात शेतीसाठी पुरेसे कर्ज उपलब्ध होऊ शकले नव्हते. तसेच नोटाबंदीच्या निर्णयामुळे जिल्हा बँकही अडचणीत सापडल्यामुळे अनेक शेतकºयांना त्यांच्या ठेवीही मिळू शकत नव्हत्या. त्यामुळे शेतकºयांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खरिपाच्या भांडवलासाठी वणवण करावी लागली होती. यावर्षी तर जिल्हा बँकेने कर्जपुरवठ्याच्या निर्धारित लक्ष्यातच एक हजार कोटी रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शेतकºयांना खरिपाच्या हंगामात पुरेसा कर्जपुरवठा होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
खरिपासाठी दोन हजार कोटींची गरज
गेल्या काही वर्षांत शेतकºयांनी जिल्हा बँकेकडून खरिपाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी उचललेल्या कर्जाची रक्कम पाहता यावर्षी शेतकºयांना किमान दोन हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे दिसून येते. २०१५-१६ या आर्थिक वर्षात शेतीसाठी खरीप रब्बी हंगामासाठी ११५० कोटींचे लक्ष्य असताना जिल्हाभरातील शेतकºयांकडून सुमारे १२९४ कोटी रुपयांच्या कर्जाची उचल झाली होती, तर २०१६-१७ वर्षासाठी १५७४ कोटी क र्जपुरवठ्याचे लक्ष्य असताना जवळपास १७२० कोटींचे कर्ज उचलले गेले. अशाप्रकारे निर्धारित लक्ष्यापेक्षा कर्जाची मागणी दरवर्षी वाढतच असताना २०१७-१८ साठी निर्धारित लक्ष्य वाढण्याची अपेक्षा असतानाही त्यात कोणतीही वाढ झाली नाही. परंतु जिल्हा बँक नोटाबंदीमुळे अडचणीत आल्याने शेतकºयांना केवळ २१२ कोटी रुपयेच कर्जपुरवठा होऊ शकला होता. परंतु याच गोष्टीचा आधार घेऊन यावर्षी जिल्हा बँकेने पीक कर्जपुरवठ्याच्या लक्ष्यामध्ये तब्बल हजार कोटी रुपयांची कपात केली आहे.

 

Web Title: The target of agricultural credit decreased by thousands of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी