ग्रामसेवक युनियनचे पंचायत समितीसमोर लक्षवेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 05:49 PM2019-07-03T17:49:20+5:302019-07-03T17:50:10+5:30
घोटी : इगतपुरी तालुका ग्रामसेवक युनियनने आपल्या विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. मागण्या पूर्ण न झाल्यास २० आॅगस्टला राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार असल्याचेयावेळी निवेदनाद्वारे सांगण्यत आले.
घोटी : इगतपुरी तालुका ग्रामसेवक युनियनने आपल्या विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. मागण्या पूर्ण न झाल्यास २० आॅगस्टला राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार असल्याचेयावेळी निवेदनाद्वारे सांगण्यत आले.
लक्षवेधी आंदोलनात विविध कर्मचारी, अधिकारी संघटना सहभागी झाल्या. गटविकास अधिकारी किरण जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंडे यांना मागण्यांबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.
सातव्या वेतन आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी करावी, प्रलंबित महागाई भत्ते सत्वर द्यावेत, मुदतपूर्व सक्तीने सेवानिवत्ती थांबवावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्तपदे आणि अनुकंपाधोरण पारदर्शक करावे, निवृत्तीचे वय ६० करावे, ५ दिवसांचा आठवडा करावा अशा विविध मागण्यांसाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे.
शासनाच्या उदासीन कारभारामुळे लक्षवेध करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांचे आदेशान्वये राज्यातील सर्व जिल्हा परिषद, सरकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात भोजनाच्या सुट्टीत उग्र निदर्शने केली.
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व त्यास संलग्न असलेल्या जिल्हा ग्रामसेवक युनियन, नर्सेस संघटना, पशुसंर्वधन चिकित्सा कर्मचारी संघटना लिपीक वर्गीय कर्मचारी संघटना, लेखा विभाग कर्मचारी संघटना, अंगणवाडी मुख्यसेविका संघटना, शाखा अभियंता संघटना, स्थापत्य अभियांत्रिकी संघटना, विस्तार अधिकारी (ग्रा. प./उद्योग) संघटना, जिल्हा कृषी तांत्रिक संघटना, औषध निर्माता अधिकारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संघटना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, वाहन चालक संघटना, परिचर संघटना, मैल कामगार संघटना यांच्या वतीने लक्षवेध आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य समन्वय समितीच्या निर्णयानुसार २० आॅगस्टला राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला जाणार आहे.