तारु खेडले गवळी वस्ती रस्ता पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 06:32 PM2020-10-03T18:32:34+5:302020-10-03T18:34:01+5:30
सायखेडा : निफाड तालुक्यातील तारखेडले गावातील गवळी वस्ती रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर अक्षरश: तळे साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. हा रस्ता तत्काळ दुरु स्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सायखेडा : निफाड तालुक्यातील तारखेडले गावातील गवळी वस्ती रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर अक्षरश: तळे साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. हा रस्ता तत्काळ दुरु स्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्याने प्रवास करणे म्हणजे शारीरिक व्याधीला आमंत्रण देण्यासारखे आहे. रस्ते दुरु स्तीसाठी वारंवार निवेदन देऊन, मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर रस्ता ग्रामस्थांच्या दळणवळणच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. तसेच तारखेडले या परिसरात बिबट्याची दहशत आहे. आतापर्यंत गावात दोन लहान मुलींचे मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता दुरु स्त होणे आवश्यक आहे.
म्हाळसाकोरे आठवडे उपबाजार, जिल्हा बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, कॉलेज अशा सर्वच कामासाठी परिसरातील ग्रामस्थांना या रस्त्यावरून ये-जा करावी लागते, मात्र या रस्त्याची दुरवस्था पाहून नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे रस्ता तत्काळ दुरु स्ती करण्याची मागणी होत आहे.
मी गेली दोन वर्ष या रस्त्याच्या दुरु स्तीसाठी जि. प. नाशिक व स्थानिक प्रशासन बरोबर पाठपुरावा करत आहे, परंतु अद्याप त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही व लक्ष देण्यात आले नाही. तसेच या रस्त्याचा पाणंद रस्ते मध्ये ही समावेश केला होता परंतु त्याला निधी देण्यात आला नाही.
- प्रशांत गवळी, तारु खेडले.