देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्र माद्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 06:46 PM2020-09-24T18:46:47+5:302020-09-24T18:46:47+5:30
चांदोरी : देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्र माद्वारे माध्यमातून होत असते. म्हणूनच राष्ट्र विकासात युवाशक्तीचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते.
चांदोरी : देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्र माद्वारे माध्यमातून होत असते. म्हणूनच राष्ट्र विकासात युवाशक्तीचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. ‘नॉट मी बट यू’ हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सामाजिक भान ठेवून समाज सेवेसाठी तत्पर असतो. देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी ही मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्र मांतून रु जविली जातात. महात्मा गांधींच्या खेड्याकडे चला या विचारधारे नुसार ग्रामविकास, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, हिवाळी श्रम शिबिर, ग्रामसंवाद, पथनाट्य, रॅली तसेच महापुरु षांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्र मातून युवा शक्ती जागृत केली जाते, त्यांचा राष्ट्र विकासासाठी वापर व्हावा म्हणून सजग केले जाते. त्यासाठी तरु णांकडून राष्ट्रसेवा घडावी हा हेतू साध्य केला जातो, असेही ते म्हणाले
कार्यक्र माचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. सविता भंडारे यांनी केले. रासेयो प्रा. प्रवीण आहेर यांनी कार्यक्र माचे संयोजन केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी प्रा. राहुल पोटे यांनी परिश्रम घेतले. सर्व प्राध्यापक व राष्ट्रीय राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी कार्यक्र मास उपस्थित होते व इतर विद्यार्थ्यांनी झूम द्वारे आॅनलाईन माध्यमातून सहभाग नोंदविला.