स्वयंपाकाची चव महागली; मसाला दरांत दुप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:17 AM2021-08-22T04:17:17+5:302021-08-22T04:17:17+5:30
चौकट- १) असे वाढले दर मसाला जुने दर ...
चौकट-
१) असे वाढले दर
मसाला जुने दर नवीन दर
रामपत्री
बदामफूल
वेलची
काळी मिरी
जिरे
नाकेश्वरी
लवंग
जायपत्री
तमालपत्री
चौकट-
महागाई पाठ सोडेना !
कोट-
गेल्या वर्षभरापासून घोंगावत असलेल्या कोरोना संकटाच्या काळातही महागाई काही कमी होण्याचे नाव घेत नाही. एक गोष्ट कमी झाली तर दुसरी लगेचच वाढते. यामुळे घरखर्च कसा चालवावा असा प्रश्न पडत आहे. आम्ही वर्षभराचा मसाला तयार करून घेत असलो तरी काही तातडीच्या वस्तू घ्याव्या लागतातच.
- सुनीता जगताप, गृहिणी
कोट-
गेल्या वर्षभरापासून कधी काम मिळते तर कधी मिळत नाही. यामुळे आहे त्या पैशांवर घर चालविताना मोठी कसरत करावी लागते. खाण्याच्या गोष्टी या घ्याव्याच लागतात तेथे कोणतीही कपात करता येत नाही. वाढणाऱ्या दरामुळे आता जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- मनीषा वाघ , गृहिणी
चौकट-
म्हणून वाढले दर
कोट-
सातत्याने येणारी नैसर्गिक आपत्ती यामुळे कमी होणारे उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे मसाल्याच्या काही पदार्थांची टंचाई निर्माण झाल्याने मसाल्यांचे पदार्थ महागले आहेत. काही ठिकाणी मागणी वाढल्यानंतर कृत्रिम टंचाईही निर्माण केली जाते. त्याचाही परिणाम दरवाढीवर होत असतो.
- राजेंद्र अमृतकर, मसाला विक्रेता
कोट-
मसाल्याच्या पदार्थांमध्ये खसखस सुमारे ४०० ते ४५० रुपयांनी वाढली आहे. उत्पादन कमी झाल्याने मागील पाच-सहा महिन्यांपासून मसाल्याच्या पदार्थांची सातत्याने दरवाढ होत आहे. यामुळे माल नेमका कोणत्या दराने विकावा असा प्रश्न कधी कधी आमच्यासमोर निर्माण होतो.
- शेखर दशपुते, किराणा व्यापारी