चवदार लोणच्याची लज्जत....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:10 AM2021-06-06T04:10:52+5:302021-06-06T04:10:52+5:30
चवदार लोणच्याची लज्जत.... रोजचे जेवण चवदार बनविणाऱ्या लोणच्याची तयारी सर्वत्र दिसून येत आहे. यंदा कैऱ्यांचे दर काहीसे वाढले असले ...
चवदार लोणच्याची लज्जत.... रोजचे जेवण चवदार बनविणाऱ्या लोणच्याची तयारी सर्वत्र दिसून येत आहे. यंदा कैऱ्यांचे दर काहीसे वाढले असले तरी वर्षभर जिभेचे चोचले पुरविणारे लोणचे बनविण्याचे काम ग्रामीण भागात जोरदार सुरू आहे. नायगाव खोऱ्यातील जायगाव येथे कैऱ्या फोडण्यास मदत करणारा हा विद्यार्थी संसाराचेही धडे गिरवत आहे.
----------------------------------------------------
फोटो---०४ नायगाव लाइट
फक्त लढ म्हणा...
नायगाव खोऱ्यातील सर्वच परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसासह वादळी वारा वाहत आहे. या पाऊस-वाऱ्याचा वितरण कंपनीलाही फटका बसला आहे. तीन दिवस खंडित झालेला विद्युत प्रवाह सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. देशवंडी परिसरात भर पावसात दुरुस्तीच्या कामात व्यस्त असलेला कर्मचारी इतरांना साथ देण्यासह फक्त लढ म्हणा असेच तर म्हणत नसेल ना ?
---------------------------------------------
फोटो - ०४ नायगाव क्लाऊड
सूर्याचा विलोभनीय आविष्कार...
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात दररोज बदल होत आहे. कधी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर कधी कडक ऊन तर कधी ढगाळ हवामान. गुरुवारी सायंकाळी आकाशात ढगांच्या आडून सूर्याच्या विविधरंगी छटा बघायला मिळाल्या. सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे टिपलेले हे विलोभनीय दृश्य.
===Photopath===
040621\015004nsk_10_04062021_13.jpg~040621\015004nsk_11_04062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०४ लोणचे ~फोटो - ०४ नायगाव क्लाऊड