दुसऱ्याच्या सुखात आपले सुख माना तेजस्वी सागर महाराज : येवल्यात कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:16 AM2018-04-04T00:16:38+5:302018-04-04T00:16:38+5:30
येवला : या जगात दु:ख कोठेही नाही, ते आपण निर्माण केले आहे. समोरच्याकडे मोठी गाडी, बंगला, पैसा आहे यामुळे आपण दु:खी होतो.
येवला : या जगात दु:ख कोठेही नाही, ते आपण निर्माण केले आहे. समोरच्याकडे मोठी गाडी, बंगला, पैसा आहे यामुळे आपण दु:खी होतो. दुसºयाच्या सुखात आपले सुख माना, असा हितोपदेश प.पू. उपाध्याय १०८ तेजस्वी सागर महाराज यांनी येवल्यात केला.
येवला मर्चंट बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात सकल जैन समाज व मारवाडी- गुजराथी मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपण सर्व महावीरांच्या सिद्धांतावर चालणारे आहोत, मग हा पंथ भेदभाव कशाला? असा सवाल उपस्थित करून ‘जो हर दरपे झुक जाये, उसें सर नही कहते और जो सही दरपेभी झुक ना जाये उसेभी सर नही कहते’ अशा शेरोशायरीतून त्यांनी हितोपदेश केला. आपले काम पूर्ण होण्यासाठी आपण कोणाचेही पाय पकडतो; पण ज्याच्या मर्जीने सगळी कामे होतात त्या परमेश्वराचे पाय कोणी धरत नाही. जगातले लोक घोड्यावरही आणि पायीदेखील चालू देत नाहीत, असे त्यांनी सांगितले. ओसवाल समाजाचे अध्यक्ष विजयकुमार श्रीश्रीमाळ यांनी प्रास्ताविक केले. मारवाडी-गुजराथी मंचचे अध्यक्ष अलकेश कासलीवाल यांनी परिचय करून दिला. यावेळी येमकोचे संचालक धनंजय कुलकर्णी, विजय चंडालिया, राजेश भंडारी, मदनलाल चंडालिया, रवींद्र बाफणा, विजय संचेती, समीर समदडिया, अनिल मुथा, मधुसूदन राका, सचिन कासलीवाल, नरेंद्र पारख, मनोज कासलीवाल, अरुण सोनी, पवन पहाडे, महेंद्र बाफणा, विलास पटणी, रमेश लोढा, प्रवीण श्रीश्रीमाळ, कांताबाई पारख, रत्नाबाई पारख, ललिता छाजेड, ललिता चंडालिया, लीलाबाई भंडारी, भारती संचेती यांच्यासह मोठ्या सेख्येने समाजबांधव उपस्थित होते.