मनपाच्य आगामी अंदाजपत्रकात करवाढीला कात्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:25 AM2021-02-06T04:25:18+5:302021-02-06T04:25:18+5:30

नाशिक- कोरोनामुळे महापालिकेच्या करवसुलीला मेाठा फटका बसला असून त्यानंतरही राजकीय दबाबामुळे प्रशासन काेरेानाची कठोर भूमिका देखील घेता येत ...

Tax cuts in Corporation's forthcoming budget! | मनपाच्य आगामी अंदाजपत्रकात करवाढीला कात्री!

मनपाच्य आगामी अंदाजपत्रकात करवाढीला कात्री!

Next

नाशिक- कोरोनामुळे महापालिकेच्या करवसुलीला मेाठा फटका बसला असून त्यानंतरही राजकीय दबाबामुळे प्रशासन काेरेानाची कठोर भूमिका देखील घेता येत नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक गणित गडगडले असले तरी इलेक्शन इयरमुळे नव्या अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारे करवाढ करण्यात आली नसल्याचे वृत्त आहे. आगामी वर्षाचे अंदाजपत्रक लवकरच सादर करणार आहे.

गेल्या वर्षी कोराेनामुळे महापालिकेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गेल्या ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत बांधकाम व्यवसाय ठप्प होता. कारखानदारी सुरू झाली तरी कोरोनाच्या वाढत्या संख्यामुळे कामगारही नव्हते आणि आर्थिक संकटही उद्योजकांपुढे उभे होते. नोकर कपात आणि वेतन कपात अशा अनेक प्रकारांमुळे नागरिक जर्जर झाले असल्याने नाशिक महापालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीबाबत सक्ती दिली नाही. आयुक्त कैलास जाधव यांनीही सक्तीने वसुलीऐवजी कर वसुलीसाठी सवलतींवर भर दिला. मात्र त्यानंतरही १३० कोटी रूपयांची वार्षिक उद्दिष्ट पूर्ण होईल किंवा नाही याबाबत शंका आहेत. सध्या ९२ कोटी रुपयेच वसूल झाले आहेत. याशिवाय पाणीपट्टी वसुलीलाही फटका बसला आहे. त्यामुळे यंदा अंदाजपत्रकात साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने आगामी अंदाजपत्रकात नवा कोणताही कर प्रस्तावित नसल्याचे वृत्त आहे.

गेले वर्षभर कोरोनामुळे केाणत्याही प्रकारची भांडवली कामे शहरात झालेली नाही. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे आताशी करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, तरीही नगरसेवकांच्या कामांचा वाढता दबाव असूनही प्रशासनाने मात्र असा करवाढीचा प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यामुळे आगामी अंदाजपत्रकात कोणतेही नवे स्त्रोत प्रशासन दाखवणार याकडे नगरसेवकांचे लक्ष लागून आहे.

इन्फो..

नवीन आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात नाशिक महापालिकेने बिटको रुग्णालयाचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर करण्याची तयारी केली आहे. त्याच प्रमाणे स्मार्टशाळा देखील सुरू करण्यात येणार आहे. मात्र, दुसरीकडे या सर्व कामांसाठी निधी कोठून आणणार हा प्रश्न आहे.

Web Title: Tax cuts in Corporation's forthcoming budget!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.