अभोणा परिसरात कांदा पिकावर करपा, मर रोगाचा प्रादूर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 05:19 PM2020-12-17T17:19:37+5:302020-12-17T17:20:18+5:30

अभोणा : शहर परिसरात काही दिवसापासून दिवसभर ढगाळ वातावरण आणि पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत असल्यामुळे लावणी झालेल्या उन्हाळ कांदा पिकाबरोबरच रोपांवर करपा व मररोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने कांदा उत्पादक हैराण झाले आहेत. महागड्या औषधांची फवारणी करून शेतकरी पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Tax on onion crop in Abhona area, outbreak of Mar disease | अभोणा परिसरात कांदा पिकावर करपा, मर रोगाचा प्रादूर्भाव

अभोणा परिसरात कांदा पिकावर करपा, मर रोगाचा प्रादूर्भाव

googlenewsNext

ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने बहुतांश शेतकऱ्यांची उन्हाळ कांद्याची रोपे जास्त पाण्यामुळे वाया गेली. तर काही ठिकाणी बियाणे कमी प्रमाणात उगवले. आता कांद्याचे जे पीक आहे त्याचे धुके व दवबिंदूंमुळे नुकसान होत आहे. यंदा कांद्याचे खूप महागडे बियाणे घ्यावे लागले .आता जेमतेम हाती आलेली रोपे वाचविण्यासाठी महागड्या औषधांच्या व्यतिरीक्त फवारणी खर्चाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, कळवण तालुक्यात नगदी पिक म्हणून उन्हाळ कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे सध्या शेत शिवारात लागवडीची लगबग जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Tax on onion crop in Abhona area, outbreak of Mar disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.