सुविधा नसलेल्यांना कर आकारणीत सवलत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:28 AM2018-05-28T00:28:35+5:302018-05-28T00:28:35+5:30

आपल्याकडे दाट लोकवस्ती नाही त्यामुळे रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या सुविधा आणि दुरुस्ती होणार नसल्याने सुविधा नसलेल्यांना भागाला कर आकारणीतून सवलत मिळण्याबाबतचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

 Tax relief should be given to those who do not have the facility | सुविधा नसलेल्यांना कर आकारणीत सवलत द्यावी

सुविधा नसलेल्यांना कर आकारणीत सवलत द्यावी

Next

आडगाव : आपल्याकडे दाट लोकवस्ती नाही त्यामुळे रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या सुविधा आणि दुरुस्ती होणार नसल्याने सुविधा नसलेल्यांना भागाला कर आकारणीतून सवलत मिळण्याबाबतचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.  या पत्रात म्हटले आहे की, नाशिक महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर खेड्यांचा मनपा हद्दीत समावेश झाल्याने विकास होईल, अशी सर्वांना अपेक्षा असली तरी आजही आमच्या परिसरात विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची लाइन, पक्के रस्ते, पथदीप नाही, ड्रेनेज नाही, घंटागाडी सर्व ठिकाणी पूर्ण झालेल्या नाही.  शिवाय पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन असली कनेक्शन घेण्यासाठी पाइपलाइन खोदाईचा खर्च करावा लागतो अशी सर्व परिस्थिती असूनही सर्व कर नियमित भरतो सुविधांसाठी पाठपुरावा करूनही सुविधा मिळत नाही.  आमच्या परिसराच्या विकासाला सुरुवात झाली असून, काही प्रमाणात लोकवस्तीदेखील होण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. अशा काही ठिकाणी रस्ते झाले तर काही ठिकाणी पथदीप झाले आहे. पण यांच्या दुरु स्तीसाठी अनेकदा आॅनलाइन तक्र ार करतो, पण त्याची दुरु स्ती होण्याआधीच तक्र ार क्लोज केली जाते त्यामुळे त्रस्त होऊन वरिष्टांकडून पाठपुरावा करण्याच्या हेतूने आम्ही पंचवटी विभागीय कार्यालयाच्या विद्युत विभागाच्या इंजिनियरला तक्र ारीबाबत विचारणा केली असता ज्या भागात दाट लोकवस्ती नाही अशा ठिकाणी दुरु स्ती होणार नाही, असा निकष लावला.  त्यामुळे आता यापुढे सुविधा मिळणार नसल्याने आयुक्तांनी मिळत असलेल्या सुविधांचा विचार करून कर आकारणीत सवलत द्यावी, अशी विनंती पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्याची चांगली चर्चा सुरू आहे.

Web Title:  Tax relief should be given to those who do not have the facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.