टॅक्सी स्टॅन्डने जागा व्यापाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:10 AM2020-12-07T04:10:11+5:302020-12-07T04:10:11+5:30

प्रहार संघटनेच्या वतीने कार्यक्रम नाशिक : प्रहार संघटनेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने शहर परिरसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ...

Taxi stands occupy space | टॅक्सी स्टॅन्डने जागा व्यापाली

टॅक्सी स्टॅन्डने जागा व्यापाली

Next

प्रहार संघटनेच्या वतीने कार्यक्रम

नाशिक : प्रहार संघटनेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने शहर परिरसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी दिव्यांगांचा सत्कार तसेच साहित्यांचे वाटप करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले. ग्रामीण भागातदेखील संघटनेच्या वतीने उपक्रम राबविण्यात आले.

आठवडे बाजारातून चारीच्या घटना

नाशिक : शहरातील प्रमुख रस्त्यांवर चोरीच्या तसेच लुटीच्या घटना समेार येत असतानाच आता आठवडे बाजारात चोरी झाल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. बुधवारचा आठवडे बाजार तसेच देवळाली गावातील सोमवारच्या आठवडे बाजारात चोरट्यांनी मोबाइल चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे ग्राहकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.

अकरावी प्रवेशाची पालकांना चिंता

नाशिक : अकरावी प्रवेशासाठीची कटऑफ वाढल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता केवळ एकच राउंड शिल्लक असल्याने अनेकांना आपल्या पाल्याचा क्रमांक लागण्याची शक्यता कमीच वाटत आहे. त्यामुळे पालकांनी आता मॅनजेमेंट कोट्यातून तसेच नॉनगॅन्टमधून प्रवेशाची तयारी दर्शविली आहे. प्रवेश मिळण्याची चिंता पालकांना लागली आहे.

गोल्फ क्लब मैदान येथील कामाला वेग

नाशिक : गेाल्फ क्लब मैदानावरील स्टेडियमच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील कामाची प्रतीक्षा होती. या कामामुळे मैदानाचे रूप पालटशर आहे. खेळाडू तसेच दैनंदिन जॉगर्स ग्रुपलादेखील येथील कामाविषयीची उत्सुकता आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मैदानाचा कायापालट होणार आहे.

उपनगर-टाकळीरोडवर गुुंडागर्दी

नाशिक : टाकळी आणि उपनगर येथील परिसरात सध्या गुंडांनी दहशत निर्माण केली आहे. रात्रीच्या सुमारास वाहनांना लक्ष्य करणे तसेच हात्यारे जवळ बाळगणे तसेच टोळीने दुचाकी चालवून परिसरात दादागिरी करण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी असतानाही पोलीस मात्र दिसत नसल्याचे नागरिकाने म्हणणे आहे.

Web Title: Taxi stands occupy space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.