नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत टीडीएफ, भाजपाचे अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:34 AM2018-06-05T01:34:11+5:302018-06-05T01:34:11+5:30
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सोमवारी टीडीएफचे रावसाहेब कचरे, भाजपाचे अनिकेत विजय नवल पाटील व अध्यक्ष विलास पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. टीडीएफकडून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
नाशिकरोड : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सोमवारी टीडीएफचे रावसाहेब कचरे, भाजपाचे अनिकेत विजय नवल पाटील व अध्यक्ष विलास पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. टीडीएफकडून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजपाच्या वतीने उत्सव हॉल व टीडीएफच्या वतीने पाटीदार भवन येथे शक्तिप्रदर्शन करत मेळावा घेण्यात आला. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्याकडे टीडीएफचे रावसाहेब कचरे, भाजपाचे अनिकेत विजय नवल पाटील व अपक्ष विलास पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. टीडीएफच्या वतीने मोठे शक्तिप्रदर्शन करत. शिक्षक विभागीय आयुक्त कार्यालय येथे आले होते. टीडीएफच्या समर्थकांनी ‘एकच निर्धार’ कचरे सर आमदार अशी घोषणा लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या, तर भाजपाचे अनिकेत विजय नवल पाटील यांच्यासमवेत पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्र प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री जयकुमार रावल आदींसह पदाधिकारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यापूर्वी मालेगावच्या झोडगे येथील अजित शांताराम लाठर व जळगाव पाचोरा येथील पांडुरंग संपत पाटील असे एकूण आतापर्यंत पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी (दि. ७) उमेदावारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.