आधी चहा पाजून आणि आता कॉफी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 01:25 AM2019-10-01T01:25:17+5:302019-10-01T01:25:33+5:30
नि वडणुकीत प्रत्येक पक्ष प्रचारासाठी दरवेळी काही नवनवीन क्लृप्ती काढत असतो. कुणी चाय पे चर्चा काढतं, कुणी लाव रे तो व्हिडीओ, कुणाचा वहिनी संवाद, कुणाची चौपाल असे वेगवेगळे उपक्रम राबवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.
नि वडणुकीत प्रत्येक पक्ष प्रचारासाठी दरवेळी काही नवनवीन क्लृप्ती काढत असतो. कुणी चाय पे चर्चा काढतं, कुणी लाव रे तो व्हिडीओ, कुणाचा वहिनी संवाद, कुणाची चौपाल असे वेगवेगळे उपक्रम राबवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अशा अभिनव संकल्पनांमुळे मतदाराला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात त्यात प्रत्येक जण यशस्वी होतोच, असेही नसते. पण अशी आकर्षक संकल्पना पुढे करून विशेषत्वे नवमतदार, युवा मतदाराला पक्षाच्या विचारधारेकडे खेचून ती मते पक्षाच्या उमेदवारालाच कशी मिळतील, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. अशीच यंदाच्या निवडणुकीत मान्यवरांसमवेत कॉफी असादेखील नवीन फंडा काढण्यात आला आहे. मात्र, अशा फंड्यांचा उद्देश आणि त्यामागील संबंधित यंत्रणांचा हेतू कळण्याइतकी सजगता सामान्य नागरिक आणि युवावर्गात आधीच आली आहे. त्यामुळे कॉलेजच्या काही युवकांच्या गटांना संबंधितांकडून ‘कॉफी’ घ्यायला या असे निमंत्रण गेले. तेव्हा त्यातील काही चाणाक्ष युवकांनी आधी चहा पाजून आता काय कॉफी पाजून भुरळ घालता का? असा सवाल करताच कॉलेजच्या कट्ट्यावर हास्याची कारंजी उसळली नसती तरच नवल.