आप कार्यकर्त्यांकडून डाॅक्टर, वकिल, इंजिनियरची वेषभूषा करून मोफत चहा आणि पकोडे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 02:35 PM2019-02-08T14:35:43+5:302019-02-08T14:45:32+5:30

'दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार' असे आश्वासन देत मोदी सरकार 2014 साली सत्तेत आले होते.पण आता 4 वर्ष झाली पण हे सरकार ना रोजगार देत आहे ना उद्योगपूरक शासकीय योजना बनवीत असल्याचा आरोप करीत  सरकारता निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टी,युवा आघाडी ने शालिमार परिसरात "चहा-पकोडे" मोफत वाटत आंदोलन केले.

"Tea-Pokode" movement by Yuva Morcha against rising unemployment. | आप कार्यकर्त्यांकडून डाॅक्टर, वकिल, इंजिनियरची वेषभूषा करून मोफत चहा आणि पकोडे वाटप

आप कार्यकर्त्यांकडून डाॅक्टर, वकिल, इंजिनियरची वेषभूषा करून मोफत चहा आणि पकोडे वाटप

Next
ठळक मुद्देआम आदमी पार्टीचे केंद्र, राज्य सरकार विरोधात आंदोलन वाढत्या बेरोजगरीविरोधात "चहा-पकोडे" वाटप करून सरकारचा निषेध मालाला दाम-हाताला काम मिळालंच पाहिजे, मोदी-फडणवीस हाय हायची घोषणाबाजी

नाशिक'दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार' असे आश्वासन देत मोदी सरकार 2014 साली सत्तेत आले होते.पण आता 4 वर्ष झाली पण हे सरकार ना रोजगार देत आहे ना उद्योगपूरक शासकीय योजना बनवीत असल्याचा आरोप करीत  सरकारता निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टी,युवा आघाडी ने शालिमार परिसरात "चहा-पकोडे" मोफत वाटत आंदोलन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये युवकांना 2 कोटी रोजगार देण्याचे वचन दिले होते. परंतु नवीन रोजगार निर्माण झालेच नाही शिवाय नोटबंदी, GST च्या तुघलकी निर्णयाने अनेक रोजगार बुडाले. आणि आता प्रधानमंत्री युवकांना पकोडे विकून रोजगार मिळविण्याचे सल्ले देत सल्याचा आरोप आपने केला आहे. याचा निषेध करण्यासाठी याप्रसंगी डाॅक्टर, वकिल, इंजिनियर यांची वेशभुषा करून कार्यकर्त्यांनी नागरीकांना मोफत चहा पाजला आणि मोदी-फडणवीस हाय हाय, नोकरी नाही- बेरोजगार नाही या सरकारला लाज नाही, रोजगार न देणाऱ्या सरकारचा निषेध असो, भाई मांगे-नोकरी; बहन मांगे नोकरी, मालाला दाम-हाताला काम मिळालंच पाहिजे यासारख्या घोषणांनी निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात आंदोलनाला प्रतिसाद मिळाला.
आगामी काळात खोटारड्या मोदी-फडणवीस सरकारला मत न देण्याचेही नागरीकांनी बोलून दाखविले. व जो मंदिर-मस्जिद च्या अस्मितेच्या राजकारणाऐवजी शाळा, रोजगार, आरोग्य याचे राजकारण करेल अश्याच पक्षाला मतदान करण्याचे आवाहन यावेळी प्रभाकर वायचळे, युवाध्यक्ष योगेश कापसे, जितेंद्र भावे, स्वप्नील घिया, एकनाथ सावळे, अनिल कौशिक, अल्ताफ शेख, महेंद्र मगर, सुमित शर्मा, अल्बाशी शेख, साहिल सिंग, शुभम पडवळ, रमेश मराठे काका, विनायक येवले, विश्वजित सावंत आदी उपस्थित होते.
 

Web Title: "Tea-Pokode" movement by Yuva Morcha against rising unemployment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.