चहा विक्रेते करणार खुल्या बाजारातून दूध खरेदी

By admin | Published: June 2, 2017 01:27 AM2017-06-02T01:27:43+5:302017-06-02T01:27:53+5:30

नाशिक : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा फटका सामान्य नागरिकांप्रमाणेच व्यावसायिकांनादेखील बसला

The tea seller will buy milk from the open market | चहा विक्रेते करणार खुल्या बाजारातून दूध खरेदी

चहा विक्रेते करणार खुल्या बाजारातून दूध खरेदी

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा फटका सामान्य नागरिकांप्रमाणेच व्यावसायिकांनादेखील बसला असून, शहरातील चहा विके्रत्यांना अहमदनगर जिल्ह्यातून होणारा दूध पुरवठा उपलब्ध न झाल्यास शहरातील चहा विक्रेत्यांनी खुल्या बाजारातील दूध खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे.
एरवी अहमदनगर जिल्ह्यातील विविध भागातून नाशिक शहरात पाश्चराइज्ड दुधाच्या पिशव्या उपलब्ध होत असल्या तरीही शुक्रवारी मात्र या दुधाच्या पिशव्या उपलब्ध न झाल्यास व्यावसायिकांनी खुल्या दूधबाजारातून दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पॅकिंग दूध आणि खुल्या बाजारातील दुधाच्या किमतीत ३० ते ४० रुपयांचा फ रक असला तरीही नाईलाज असल्याने चहा विक्रेत्यांना खुल्या बाजारातून दुधाची खरेदी करावी लागणार आहे. शहरातील वडाळा, गंगापूररोड, अंबड, पाथर्डी यांसारख्या भागातील गोठ्यातील दूध खुल्या बाजारातील दूध विक्रीसाठी वापरता येणे श्क्य होणार आहे.
पॅकिंग दुधाच्या तुलनेत खुल्या बाजारातील दूध दीर्घकाळ टिकविणे अवघड असल्याने सुट्या दुधाची साठवणूक करताना चहा विक्रेत्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार
आहे. शहरातील बसस्थानके, महाविद्यालयांच्या परिसरात चहा विक्रेत्यांक डे चहा पिण्यासाठी
कायमच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने घरगुरी वापरासह व्यावसायिकांना दूध किती प्रमाणात उपलब्ध होते, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

Web Title: The tea seller will buy milk from the open market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.