शिक्षक व मुख्याध्यापकांना पेपर तपासणीतून सूट मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 06:10 PM2018-10-20T18:10:07+5:302018-10-20T18:10:35+5:30
ज्या मुख्याध्यापकांची व ज्येष्ठ शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी असेल किं वा आजारपणाने ते त्रस्त असतील अशा शिक्षक व मुख्याध्यापकांना पेपर तपासणी कामातून सूट द्यावी, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव नितीन उपासनी यांच्याकडे करण्यात आली आहे.
सिन्नर : ज्या मुख्याध्यापकांची व ज्येष्ठ शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी असेल किं वा आजारपणाने ते त्रस्त असतील अशा शिक्षक व मुख्याध्यापकांना पेपर तपासणी कामातून सूट द्यावी, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव नितीन उपासनी यांच्याकडे करण्यात आली आहे.
जिल्हा मुख्याध्यापक संघ व महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाची बैठक सचिव उपासने यांच्या अध्यक्षतेखााली पार पडली. शाळा मान्यतावर्धित व कायम हा प्रश्न निकाली काढावा, शाळांकडून मान्यता कायम करण्यासाठी फक्त २ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी फी आकारणी करावी आदी मागण्यांकडे उपासनी यांचे लक्ष वेधण्यात आले. सकारात्मक दृष्टिकोनातून मंडळात आलेल्या प्रत्येक मुख्याध्यापक ांना सन्मानाची वागणूक मिळेल, कामे करण्यासाठी थेट माझ्याशी संपर्क साधा, असे सांगत मान्यतावर्धित व कायम हा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल, मंडळाच्या पेपर तपासणीचा निर्णय लवकरच घेऊ असे आश्वासन उपासनी यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. केंद्र समायोजन, नवीन इंडेक्स फाइल, तक्रार निवारण कक्ष, शाळा तपासणी, नवीन केंद्र निर्मिती, दंड आकारणी ही सर्व कामे आठ दिवसांच्या आत मार्गी लावण्याचे आश्वासन उपासनी यांनी दिले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, गुफरान अन्सारी, सुरेश शेलार, उपाध्यक्ष माणिक मडवई, बी. के. शेवाळे, राजेंद्र सावंत, पुरुषोत्तम रकिबे, शेख परवेझा, एस. डी. वाघ, किरण पगार, एम. व्ही. बच्छाव, बी. डी. गांगुर्डे, सचिन पगार, के . टी. उगलमुगले, साची शेवाळे, एल. शिंदे, सखाराम जाधव, एच. बी. नळे, ए. पी. पिंगळे, डी. एस. ठाकरे, नंदराज देवरे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी प्रास्तविक केले. एस. के. सावंत यांनी आभार मानले.