शिक्षक समितीतर्फे अध्यक्षांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:30 AM2018-08-06T00:30:01+5:302018-08-06T00:30:26+5:30
नाशिक : जिल्हा शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने प्रलंबित प्रश्नांसंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे व शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, शिक्षण सभापती यतिन पगार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्वरित सर्व प्रश्न मार्गी लावून सर्व संघटनांची सभा बोलाविण्याचे आश्वासन अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शिष्टमंडळाने विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

या शिष्टमंडळात राज्य पदाधिकारी नंदू आव्हाड, जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष, साहेबराव पवार, उपाध्यक्ष सचिन कापडणीस, प्रशांत वाघ, प्रल्हाद निकम, जनार्दन कडवे, राजेंद्र भामरे, सुनील सांगळे, पंढरीनाथ निकम, भास्कर राक्षे, सोमनाथ पवार, यशवंत साबळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.चट्टोपाध्याय समितीचे प्रस्ताव त्वरित मंजूर करणे, बदली विस्थापित शिक्षकांना समाणीकरणाच्या जागा खुल्या करून पदस्थापना देण्यात यावी, एकस्तर वसुली थांबविणे, विस्थापित शिक्षकांचे माहे जून २०१८ चे वेतन अदा करणे, प्रलंबित बिले (३९०) त्वरित मंजूर करणे, एकाच आवारातील १०० पटसंख्या असणाºया शाळांच्या एकत्रीकरणास स्थगिती द्यावी, शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत अदा करावे, स्वच्छतागृहाचे अनुदान त्वरित वितरीत करण्यात यावे, ७ ते ९ आॅगस्ट २०१८ या कालावधीत प्रशिक्षण वा परीक्षा घेऊ नये, नियमित फंडाची प्रकरणे वा इतर बिले महिन्याच्या आत अदा करण्याचे नियोजन करावे. आदि मागण्यांवर चर्चा करण्यात आली.