शिक्षक मतदारसंघ : २२ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 02:13 AM2018-06-09T02:13:44+5:302018-06-09T02:13:44+5:30
नाशिकरोड : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी उमेदवारी अर्जाच्या छाननीत वयाच्या अटीमुळे अजित शांताराम लाठर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला असून, गजानन काशीराम खराटे, कुणाल नरेंद्र दराडे या दोन जणांनी माघार घेतली आहे. निवडणूक रिंगणात २२ उमेदवार राहिले आहेत.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत २५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. निवडणुकीसाठी ३० वर्ष पूर्ण वयाची अट आहे.
उमेदवार अजित लाठर यांचे वय २८ इतके असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तर उमेदवार गजानन काशीराम खराटे, कुणाल नरेंद्र दराडे या दोन जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे अनिकेत विजय पाटील, सुनील रमेश बच्छाव, सुरेश पांडुरंग पाटील, अजितराव किसन दिवटे, अमित ऊर्फ आप्पासाहेब शिंदे, अशोक शंकर पाटील, किशोर भिकाजी दराडे, दिनेश अभिमन्यू देवरे, रविंद्र भिवाजी पटेकर, विलास शांताराम पाटील, विठ्ठल रघुनाथ पानसरे, सुनील पांडुरंग पंडित, प्रताप नारायणराव सोनवणे, सुनील धोंडू फरस, बाळासाहेब संभाजी गांगर्डे, संदीप त्र्यंबकराव बेडसे, भाऊसाहेब नारायण कचरे, शालीग्राम ज्ञानदेव भिरूड, महादेव साहेबराव चव्हाण, महेश भिका शिरूडे, शेख मुक्तार अहमद कासीम, प्रकाश हिला सोनवणे हे २२ जण निवडणूक रिंगणात आहेत. सोमवार दि.११ दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.