प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक विकास आघाडीचे धरणे सोमवारी हुतात्मा स्मारकात बैठक
By admin | Published: December 7, 2014 01:23 AM2014-12-07T01:23:41+5:302014-12-07T01:24:10+5:30
प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक विकास आघाडीचे धरणे सोमवारी हुतात्मा स्मारकात बैठक
नाशिक : शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित १४ प्रकारच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.८) हुतात्मा स्मारकात बैठक होणार असून, सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर विकास आघाडीचे नेते प्रकाश सोनवणे यांनी दिली. विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करावे, अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या ५० हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना संच मान्यतेनुसार तत्काळ समायोजन करावे, शाळांचे वेतनेत्तर अनुदान त्वरित द्यावे, शिक्षकांचे दरमहा १ तारखेला वेतन मिळावे, कायम विनाअनुदानित तत्त्व रद्द करावे व कायम विनाअनुदानित शाळा व ज्यूनिअर कॉलेजला अनुदान द्यावे, यासह विविध प्रकारच्या प्रमुख १४ मागण्यांचा त्यात समावेश आहे. यासंदर्भात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर विकास आघाडी आयोजित संस्थाचालक संघ व शिक्षक विकास आघाडी व इतर संघटनांची सारडा कन्या विद्यालयात बैठक होऊन त्यात संच मान्यता (अतिरिक्त कर्मचारी) व इतर शासकीय धोरणांमुळे शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी संस्थाचालक यांच्यावर शासनाने अन्याय केला आहे. त्यासाठी शहरातील प्रत्येक शाळेतील एक कर्मचारी व शिक्षक यांनी हुतात्मा स्मारक येथे सोमवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थाचालक संघाचे अॅड. नितीन ठाकरे, कोंडाजी आव्हाड, मनोज पिंगळे, अशोक सोनजे, प्रकाश सोनवणे, पुरुषोत्तम रकिबे, बाळासाहेब सोनवणे, शोभना शिंदे, सुभाष पाटील आदिंनी केले आहे. (प्रतिनिधी)