तान नदीला आलेल्या पुरात शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 04:59 PM2019-07-10T16:59:06+5:302019-07-10T16:59:21+5:30

सुरगाणा : तालुक्यातील अंबाठा केंद्रातील उंबराचापाडा (को) या जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेले शिक्षक लक्ष्मण ऊलूशा गावित (वय ५०) हे ...

Teacher dies in Taan river flood | तान नदीला आलेल्या पुरात शिक्षकाचा मृत्यू

तान नदीला आलेल्या पुरात शिक्षकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देसदर मृतदेह नातेवाईकांना दाखिवला असता तो लक्ष्मण यांचाच असल्याची खात्री झाली.

सुरगाणा : तालुक्यातील अंबाठा केंद्रातील उंबराचापाडा (को) या जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेले शिक्षक लक्ष्मण ऊलूशा गावित (वय ५०) हे तान नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे.
लक्ष्मण गावित हे सुभाषनगर येथे राहणारा त्यांंचा भाऊ हिरामण गावित यांच्याकडे सोमवारी (दि.९) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जेवणासाठी तान नदीचे पात्र पार करु न जात असतांना जोरदार आलेल्या पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहून गेले. रात्रीची वेळ असल्याने घरच्या कोणाच्याही लक्षात आले नाही. लक्ष्मण जेवणास न आल्याने शोधा शोध सुरू झाली असता दुसऱ्या दिवशी कोठुळा गावानजीक नदी पात्रातील झाडा झुडपात एका अज्ञात व्यक्तिचा मृतदेह आढळून आल्याची खबर कोठुळा येथील पोलीस पाटील यांनी पोलिसांना दिली. सदर मृतदेह नातेवाईकांना दाखिवला असता तो लक्ष्मण यांचाच असल्याची खात्री झाली. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पोलिस निरीक्षक दिलीपिसंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार झुरडे, सहारे हे अधिक तपास करीत आहेत.
चार ते पाच वर्षापासून परागंदा
जिल्हा परिषद शाळा उंबराचापाडा (को) येथील लक्ष्मण गावित हे शिक्षक चार ते पाच वर्षापासून परागंदा होते. अनेक वेळा प्रशासनाने नोटिसा देऊनही कामावर रु जू झाले नव्हते. त्यामुळे त्यांची शिक्षण विभागा मार्फत खातेनिहाय चौकशी सुरू होती.
- संजय कुसाळकर, गटशिक्षणाधिकारी, सुरगाणा.

Web Title: Teacher dies in Taan river flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.