26हजार शिक्षक देणार आज ‘शिक्षक पात्रता परीक्षा’
By admin | Published: December 14, 2014 12:56 AM2014-12-14T00:56:47+5:302014-12-14T00:58:50+5:30
26हजार शिक्षक देणार आज ‘शिक्षक पात्रता परीक्षा’
नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजन करण्यात आलेली ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ रविवारी शहरातील विविध शाळा महाविद्यालयात होणार आहे़ यासाठी ७९ केंद्र असून, एकूण २६१४५ शिक्षक ही पात्रता परीक्षा देणार आहेत़ या परीक्षेसाठी २० झोनल आॅफिसर, ८० सब झोनल आॅफिसर, १०५० कर्मचारी, २०० सुपरवायझर, ४ भरारी पथके यांची नियुक्ती करण्यात आली असून, परीक्षेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रहिम मोगल यांनी पत्रकान्वये दिली आहे़ मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमातून ही परीक्षा होत असून, प्रथम पेपर सकाळी १०़३० ते १, तर द्वितीय पेपर दुपारी २़३० ते ५ वाजेपर्यंत आहे़ परीक्षार्थी शिक्षकांना आॅनलाइन प्रवेश पत्र देण्यात आले असून, संपूर्ण जिल्'ाचे नियंत्रक कक्ष हा कन्या विद्यालयाजवळील गटसाधन केंद्र येथे स्थापन करण्यात आला आहे़ परीक्षार्थींना या ठिकाणी त्यांचे केंद्र, बैठक व्यवस्था व पत्त्याची चौकशी केल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाकडून माहिती देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)