शिक्षक आमदार निवडणूक निकालाची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:35 AM2018-06-29T01:35:48+5:302018-06-29T01:37:10+5:30

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता येथील सेंट्रल वेअर हाउसमध्ये सुरुवात करण्यात आली. प्रारंभी मतदान केंद्रनिहाय मतपेट्या मतमोजणीस्थळी आणण्यात आल्या, मतदान केंद्रनिहाय झालेले मतदान व प्रत्यक्ष मतपेटीत असलेली मते याची खातर जमा करण्यात आली. त्यासाठी २० टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक टेबलावर एक मतपेटी अशाप्रकारे एका फेरीत २० मतपेट्यांतील मतपत्रिकेची मोजणी करण्यात आली. त्यासाठी तीन तासांचा कालावधी लागला.

Teacher Emergency Election Results | शिक्षक आमदार निवडणूक निकालाची उत्सुकता

शिक्षक आमदार निवडणूक निकालाची उत्सुकता

Next
ठळक मुद्देसमर्थकांची गर्र्दीमतमोजणी प्रकिया पुढे वेगाने सुरू

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता येथील सेंट्रल वेअर हाउसमध्ये सुरुवात करण्यात आली. प्रारंभी मतदान केंद्रनिहाय मतपेट्या मतमोजणीस्थळी आणण्यात आल्या, मतदान केंद्रनिहाय झालेले मतदान व प्रत्यक्ष मतपेटीत असलेली मते याची खातर जमा करण्यात आली. त्यासाठी २० टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक टेबलावर एक मतपेटी अशाप्रकारे एका फेरीत २० मतपेट्यांतील मतपत्रिकेची मोजणी करण्यात आली. त्यासाठी तीन तासांचा कालावधी लागला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राजाराम माने, निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयाम यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या मतमोजणीसाठी १५० कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
दुपारी १२ वाजेपर्यंत मतपेट्यातील मतपत्रिकेची खात्री करीत असताना, मोजलेल्या मतपत्रिका एका हौदात टाकून एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येकी २५ याप्रमाणे मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यात येऊन, त्यातून वैध, अवैध व संशयित मतपत्रिकांची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण ४७ हजार ९७८ मते वैध ठरली. एकूण वैध मतदानाच्या निम्मे व अधिकचे एक अशाप्रकारे विजयी होण्यासाठी उमेदवाराला पहिल्या फेरीत २३ हजार ९९० मतांचा कोटा ठरवून देण्यात आला. त्यानंतर दुपारी १ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. सर्व मतपत्रिकेचे सरमिसळ केल्यानंतर वैध, अवैध मतांचे वर्गीकरण करण्यास दुपारी १२ वाजता सुरुवात झाली. प्रत्येक टेबलावर एक हजार अशाप्रकारे २० हजार मतांचे वर्गीकरण करण्यासाठी तब्बल तीन तास लागले तर दुपारी ३ वाजता पहिली फेरी पूर्ण झाल्यावर मतमोजणी अधिकारी, कर्मचाºयांची जेवणाची सुटी झाली व पुन्हा ४ वाजता २० हजार मतपत्रिकेचे वाटप टेबलावर करण्यात आले. त्यासाठी तीन तासांचा कालावधी लागला. यादरम्यान मतमोजणी टेबलावर नेमलेल्या मतदान प्रतिनिधींनी उमेदवाराची आकडेमोड केल्यामुळे, काही उमेदवारांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला.
समर्थकांची गर्र्दी
अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीच्या मतमोजणीविषयी मतदार व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असल्याने सकाळी ११ वाजेनंतर निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मतमोजणी केद्रांतदेखील सकाळी ७ वाजे पासून उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी हजर झाले होते. परंतु मतमोजणीच्या किचकट पद्धतीमुळे काही तासांतच उमेदवार व प्रतिनिधींचा उत्साह कमी होत गेला, तर दुसरीकडे मतमोजणी अधिकारी व कर्मचाºयांनी मतमोजणी प्रकिया पुढे वेगाने सुरू केली.

Web Title: Teacher Emergency Election Results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.