पाटील विद्यालयात शिक्षक पालक मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:52 AM2019-04-02T00:52:31+5:302019-04-02T00:53:02+5:30

लासलगाव येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा घेण्यात आला. विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती समजावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Teacher Parents Meet in Patil School | पाटील विद्यालयात शिक्षक पालक मेळावा

लासलगावी दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळाव्यास उपस्थित मान्यवर.

googlenewsNext

लासलगाव : येथील लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा घेण्यात आला. विद्यार्थी-पालक व शिक्षकांमध्ये संवाद व्हावा, विद्यार्थ्याची प्रगती समजावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याची सुरुवात सरस्वती पूजन व संस्थेचे संस्थापक कै.दत्ताजी पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. जिजामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक अनिता आहिरे यांनी प्रास्तविक केले. दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व समाजशास्त्र या विषयासाठी विश्वास पाटील तसेच इंग्रजीसाठी केशव तासकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक शंतनू पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे नीरसन केले. पालकांमधून साईदा तांबोळी, अर्चना गिलडा, श्याम खलसे, धनाजी गिते, योगीता खैरे यांनी हितगूज केले. विद्यार्थ्यांमधून प्रतीक्षा खैरे हिने मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, मुख्याध्यापक अनिता आहिरे, यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Teacher Parents Meet in Patil School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.