शिक्षक पोहचले विद्यार्थ्यांच्या घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 04:10 PM2020-08-09T16:10:36+5:302020-08-09T16:11:04+5:30
देशमाने : आॅनलाइन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण आपल्या दारी या अभिनव उपक्र माच्या माध्यमातून थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्र म देशमाने बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राबवित आहेत.
शिक्षक, शिक्षिका घरी येऊन मुलांना शिकवित असल्याने पालकही आनंदित झाले आहेत. तसेच विद्यार्थीही कोरोनाच्या संकट काळात शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र अनेकांना ते शक्य होत नाही. पालकाची आर्थिक परिस्थिती नसल्याने मोबाइल नाहीत. जे आहेत ते अँड्रॉइड नाहीत तर कुठे नेटवर्कची अडचण. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून देशमाने येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पुंडलिक अनारसे, संजय सोनवणे, दादासाहेब बोराडे, अनिल महाजन, सुनील मखरे, शंकर विधाते, मनिषा खैरनार, जिजा जावळे यांनी हा उपक्र म हाती घेतला आहे.दुघड वस्ती, आदिवासी वस्ती, बनकर वस्ती, गडाख वस्ती, जगताप वस्ती आदि ठिकाणी राहणाºया पाच-सहा मुलांच्या गटास फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून शिकविण्यात येत आहे. त्यामुळे शाळा बंद शिक्षण सुरू असे चित्र निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी, रु चि टिकून आहे. या उपक्र माचे येवला पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे, केंद्रप्रमुख एन. व्ही. केदारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश दुघड, गोसावी गुरु जी यांनी कौतुक केले आहे.