शिक्षकांचे पगार आता एका क्लिकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 09:50 PM2020-08-06T21:50:07+5:302020-08-07T00:29:42+5:30
सिन्नर : तालुक्यातील शिक्षकांचा पगार एका क्लिकवर त्यांना घरबसल्या बघावयास मिळणार आहे. येथील तंत्रस्रेही शिक्षकांनी इ-सॅलरी अॅपची निर्मिती केली असून, मान्यवरांच्या उपस्थितीत या अॅपचा शुभारंभ करण्यात आला.

इ-सॅलरी अॅपमुळे तालुक्यातील ६४० प्राथमिक शिक्षकांना एकाच क्लिकवर आपले वेतन घरबसल्या पहायला मिळणार आहे. तसेच वार्षिक विवरण पत्रकही याद्वारे वर्षाकाठी उपलब्ध होणार असून, इन्कमटॅक्ससाठी त्याचा उपयोग होणार आहे. प्रत्येक शिक्षकाला वैयक्तिक आयडी व पासवर्ड असल्यामुळे त्याची गोपनीयता राखली जाणार आहे. इ-सॅलरी सुविधा शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात शिक्षक संघाचे अमोल कहाळे, गोरक्ष सोनवणे, रमेश विघ्ने, नितीन बोंबले यांनी परिश्रम घेतले.