शिक्षकांच्या वेतनाची माहिती एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 09:33 PM2020-07-20T21:33:19+5:302020-07-21T02:00:04+5:30

येवला : शिक्षकांना त्यांच्या पगाराची समग्र माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी आष्टीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांच्या पुढाकाराने तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने ‘ई सॅलरीबुक’ हे अ‍ॅप तयार करण्यात आले असून, येवला तालुक्यातील शिक्षकांना एका क्लिकवर वेतनाची अद्ययावत माहिती मिळू लागली आहे.

Teacher salary information at a click | शिक्षकांच्या वेतनाची माहिती एका क्लिकवर

शिक्षकांच्या वेतनाची माहिती एका क्लिकवर

Next

येवला : शिक्षकांना त्यांच्या पगाराची समग्र माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी आष्टीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांच्या पुढाकाराने तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने ‘ई सॅलरीबुक’ हे अ‍ॅप तयार करण्यात आले असून, येवला तालुक्यातील शिक्षकांना एका क्लिकवर वेतनाची अद्ययावत माहिती मिळू लागली आहे.
येवला तालुक्यात जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांची संख्या सातशेच्या वर आहे. शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीतून होते. दरमहा शिक्षकांना आॅफलाइन पगार स्लिप दिल्या जातात. परंतु काहींना वेळेवर पोहोच करताना बराच वेळ जात असे. याबाबत पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी वाघमारे यांना काही तंत्रस्नेही शिक्षकांनी ई- सॅलरीबुक या अ‍ॅपबाबत सांगितले. आपल्या तालुक्यातही असा उपक्र म राबविण्याची परवानगी त्यांनी दिली. गटशिक्षणाधिकारी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाने सर्व केंद्रातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने पगारबील अपलोड करण्याचे शिवधनुष्य जिल्हा परिषद शाळा एरंडगावचे मुख्याध्यापक कांगणे यांनी लीलया पेलले. आता तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांना आपला पगार आपल्या मोबाइलवर पाहता येणार आहे. तसेच पीडीएफ डाऊनलोड करता येणार आहे.
---------------------
प्ले स्टोअरवरून घेता येईल अ‍ॅप
प्ले स्टोअरवरून ई-सॅलरीबुक अ‍ॅप डाऊनलोड करु न सर्वांनी आपला पगाराचा तपशील आपल्या स्मार्टफोनवर माहे मार्च २०२० पासून आतापर्यंतचा पहायला मिळाल्याने सर्व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. यासाठी पंचायत समिती येवला येथील वरिष्ठ सहायक एस. आर. पाटील व एकनाथ घुले यांचे सहकार्य लाभले.
----------------
ई-सॅलरीबुक हे अ‍ॅप सर्व शाळा, कार्यालये वापरू शकतात. आपल्या मोबाइलमध्ये हे अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर आपला पासवर्ड दिला असल्याने आपले वेतन आपल्यालाच पाहता येते. सर्व शिक्षकांना उपयोगी पडणारे व हातळण्यास सुलभ आहे.
- चंद्रकांत जानकर, तालुकाध्यक्ष, दिव्यांग कर्मचारी संघटना, येवला

Web Title: Teacher salary information at a click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक