नॅबच्या वतीने दृष्टिहीन मुलांसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:16 AM2018-10-19T00:16:42+5:302018-10-19T00:17:45+5:30
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, युनिट महाराष्टÑ व सेन्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टिहीन व कर्णबधिर मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
नाशिक : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, युनिट महाराष्टÑ व सेन्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टिहीन व कर्णबधिर मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेचे उद्घाटन मोतीवाला संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. अफसाना मोतीवाला यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मोतीवाला कॉलेजचे उपाध्यक्ष डॉ. स्वानंद शुक्ला उपस्थित होते. व्यासपीठावर डॉ. स्वानंद शुक्ला, गोपी मयूर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, अशोक बंग, सूर्यभान साळुंखे आदी उपस्थित होते.
यावेळी अफसाना मोतीवाला म्हणाल्या की, समाजातील अपंग वक्ती आणि विशेष बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक पुनर्वसनाची जबाबदारी समाजाची आहे.
प्राचार्य स्वानंद शुक्ला यांनीही मार्गदर्शन केले. नॅब संस्थेचे महासचिव गोपी मयूर यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प अध्यक्ष अशोक बंग यांनी या कार्यशाळेचे महत्त्व विशद केले. वर्षा जाधव यांनी सूत्रसंचालन केले.