दिंडोरीतील शिक्षकांचे उपक्रम राज्यातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:18 AM2021-09-14T04:18:04+5:302021-09-14T04:18:04+5:30
वणी : शिक्षण विभाग पंचायत समिती, दिंडोरी यांच्या वतीने प्रकाशित होत असलेले पुस्तक राज्यभरातील शिक्षकांसाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन ...
वणी : शिक्षण विभाग पंचायत समिती, दिंडोरी यांच्या वतीने प्रकाशित होत असलेले पुस्तक राज्यभरातील शिक्षकांसाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील प्रयोगशील शिक्षकांचे कोविडकाळातील नावीन्यपूर्ण उपक्रम असलेल्या ‘भयकाळातील झुंज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती कामिनी चारोस्कर, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, छाया गोतरणे, सदस्य वसंत थेटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल अपसुंदे, शंकर चारोस्कर, किसनलाल बोरा स्कूलचे चेअरमन महेंद्र बोरा आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पंचायत समिती, शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणारा हा पुस्तक प्रकाशनाचा राज्यभरातील पहिलाच उपक्रम होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी बी. डी. कनोज यांनी केले. सभापती कामिनी चारोस्कर, भास्करराव भगरे, छाया गोतरणे, वसंत थेटे, महेंद्र बोरा यांनीही दिंडोरी शिक्षण विभागासह तालुक्यातील सर्व शिक्षकांचे कौतुक करून ‘भयकाळातील झुंज’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्याबद्दल अभिनंदन केले.
प्रयोगशील शिक्षकांना लेखनासाठी प्रवृत्त करून पुस्तक प्रकाशित करण्याचा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुस्तक प्रकाशनासाठी उल्लेखनीय योगदान देणारे वैशाली प्रकाशनाचे विलास पोतदार, पुस्तक निर्मितीकामी योगदान देणारे विलास जमदाडे, श्रावण भोये राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार प्राप्त प्रकाश चव्हाण, जि. प. गुणवंत शिक्षक नितिन देवरे, पुस्तकाचे लेखक राजेंद्र उगले, साहित्यिक राकेश वानखेडे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व लेखक शिक्षकांना अतिथींच्या हस्ते पुस्तकाची प्रत देऊन गौरविण्यात आले.
लेखकांच्या वतीने कल्याणी वाशिकर व किरण शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार किसन पवार यांनी मानले.
कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी एस. पी. पगार, सी. बी. गवळी, के. पी. सोनार, केंद्रप्रमुख राजेंद्र गांगुर्डे, दिनेश जगताप, विलास बिरारी, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन वडजे, शिक्षण परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब जाधव, समितीचे अध्यक्ष राजेंद्र परदेशी, जयदीप गायकवाड, संदीप चौधरी आदी उपस्थित होते.
चौकट...
पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांड्ये, महापालिका आयुक्त कैलास जाधव, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथेदेखील प्रकाशन करण्यात आले.
(१३ वणी)
पुस्तक प्रकाशनप्रसंगी नरहरी झिरवाळ, कामिनी चारोस्कर, भास्कर भगरे, छाया गोतरणे, वसंत थेटे, विठ्ठल अपसुंदे, शंकर चारोस्कर, बी. डी. कनोज आदी.
130921\13nsk_34_13092021_13.jpg
पुस्तक प्रकाशन प्रसंगी नरहरी झिरवाळ, कामिनी चारोस्कर, भास्कर भगरे, छाया गोतरणे, वसंत थेटे, विठ्ठल अपसुंदे, शंकर चारोस्कर, बी. डी. कनोज आदी.