वेतन कपातीचा निर्णय झाल्यास शिक्षकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:15 AM2021-05-26T04:15:12+5:302021-05-26T04:15:12+5:30
महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाविरुद्ध आवाज उठवला. नंतर शासनाला हा आदेश रद्द करावा लागला होता. परिषदेने याबाबत ...
महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाविरुद्ध आवाज उठवला. नंतर शासनाला हा आदेश रद्द करावा लागला होता. परिषदेने याबाबत म्हटले आहे, शिक्षकांच्या वेतनास कात्री कशी लावता येईल, यासाठी थेट प्रयत्न करून झाल्यावर शिक्षण विभागाकडून दुसरा प्रयत्न सुरू आहे. त्याचे माॅडेलही तयार होत आहे. एक त्रयस्थ संस्था नेमण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. ही संस्था एक चाचणी किंवा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची प्रगती ठरवणार असून, त्यावरून शिक्षकांचे मूल्यमापन करणार आहे. या मूल्यमापनाच्या आधारे शिक्षकांची वेतनवाढ व अन्य लाभ ठरणार आहेत. या धोरणाविरोधात लवकरच शिक्षक परिषदेच्या वतीने नाशिक येथे आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती डी.यू. आहिरे, दत्ता वाघे पाटील, शरद निकम, गुलाब भामरे, संजय पवार, विनीत पवार, संजय पाटील, तुकाराम मांडवडे यांनी दिली आहे.
कोट...
महाराष्ट्रातील बहुतांश भाग हा ग्रामीण, कामगार वस्तीतील आहे. अनुदानित व सरकारी शाळांमध्ये बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण होते. आजही काही पालकांकडे शैक्षणिक, भौविक सुविधा नाहीत. शिक्षक हा प्रामाणिकपणे काम करत आला आहे. त्यामुळे अशाप्रकारे शिक्षकांचे मूल्यमापन चुकीचे ठरेल.
- संजय पवार, उपाध्यक्ष, राज्य शिक्षक परिषद