देशाच्या समृद्धीसाठी शिक्षकच दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 11:39 PM2020-12-09T23:39:59+5:302020-12-10T00:31:41+5:30

कळवण : शिक्षकी पेशातला माणूस हा समाजातला आदर्श नागरिक असतो. समाजाची शिक्षकांप्रति कार्याची वेगळी मोजपट्टी आहे. शिक्षकीपेशा सर्व क्षेत्रात पवित्र मानला जातो, मात्र त्याचे पावित्र्य जोपासण्यासाठीची जबाबदारी सध्याच्या शिक्षकांची आहे. सेवानिवृत्तीनंतर वेळ मिळेल तेव्हा लिखाण करण्याचे आवाहन ॲड. शशिकांत पवार यांनी केले.

Teachers are the guide for the prosperity of the country | देशाच्या समृद्धीसाठी शिक्षकच दिशादर्शक

देशाच्या समृद्धीसाठी शिक्षकच दिशादर्शक

googlenewsNext
ठळक मुद्देशशिकांत पवार : कळवणला सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांचा सत्कार

कळवण : शिक्षकी पेशातला माणूस हा समाजातला आदर्श नागरिक असतो. समाजाची शिक्षकांप्रति कार्याची वेगळी मोजपट्टी आहे. शिक्षकीपेशा सर्व क्षेत्रात पवित्र मानला जातो, मात्र त्याचे पावित्र्य जोपासण्यासाठीची जबाबदारी सध्याच्या शिक्षकांची आहे. सेवानिवृत्तीनंतर वेळ मिळेल तेव्हा लिखाण करण्याचे आवाहन ॲड. शशिकांत पवार यांनी केले.

पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने कोरोना कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ॲड.पवार बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक मोतीराम शिंदे , कृष्णाजी बच्छाव, कळवण येथील मुलींच्या शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र पगार, आरकेएम विद्यालयाचे प्राचार्य एल. डी. पगार उपस्थित होते. दोन वर्ष यशस्वी कामकाज केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव यांचा शिक्षणविस्तार अधिकारी संघटना, केंद्रप्रमुख संघटना, पेन्शनर असोसिएशन व शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षणविस्तार अधिकारी दिलीप पवार, केंद्रप्रमुख रमेश शिंदे, जिभाऊ निकम, पी. के.आहेर, कळवण व देवळा शिक्षक पतसंस्थेचे संचालक भास्कर भामरे, स्वाती शिरसाठ आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पी. एम. महाडीक व समाधान सोनवणे यांनी केले. वर्षा बच्छाव यांनी आभार मानले.
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख -
केदा पगार (मोकभणगी), बापू बहिरम (नांदुरी), मंदा जाधव (पाळे)
सेवानिवृत्त मुख्याध्यापक -
रामचंद्र अहिरराव (पिळकोस), नारायण बंगाळ (देवळी वणी), कांतीलाल ढुमसे (देसगाव), रवींद्र देशमुख (निवाणे), लीलावती सूर्यवंशी (गणोरे), अंजना कोठावदे (शिरसमणी)
सेवानिवृत्त शिक्षक -
निंबा जाधव (जामशेत), रोहिदास चव्हाण (वडपाडा), रामदास बागुल (मोहनदरी), हिराबाई जाधव (बेलबारे), यमुना पवार (कळवण मुली), लता जगताप (अभोणा), मीना पवार (देसगाव), निर्मला वळींकर (रामनगर)

Web Title: Teachers are the guide for the prosperity of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.