शिक्षक, महिलांना पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:10 AM2019-01-14T01:10:16+5:302019-01-14T01:10:38+5:30

इनरव्हील क्लब आॅफ जेन-नेक्ट नाशिक यांच्यातर्फे रविवारी (दि. १३) भविष्यातील सजग नागरिक घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर समाजाला कुटुंब मानत वंचित घटकांसाठी समाजसेवेत स्वत:ला झोकून देणाºया महिलांना सहयोगिनी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

Teachers, award to women | शिक्षक, महिलांना पुरस्कार प्रदान

नेशन बिल्डर अवॉर्ड व सहयोगिनी पुरस्कारार्थींसमवेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांच्यासह प्रा. दीपाली चांडक, शिला देशमुख, सचिव सरोज दशपुते, सुरेखा महाले, डॉ. मीनल पलोड आदी.

googlenewsNext
ठळक मुद्दे‘इनरव्हील क्लब आॅफ जेन-नेक्टस’चा उपक्रम

नाशिक : इनरव्हील क्लब आॅफ जेन-नेक्ट नाशिक यांच्यातर्फे रविवारी (दि. १३) भविष्यातील सजग नागरिक घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर समाजाला कुटुंब मानत वंचित घटकांसाठी समाजसेवेत स्वत:ला झोकून देणाºया महिलांना सहयोगिनी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
गंगापूररोड परिसरातील एका सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा प्रा. दीपाली चांडक, शिला देशमुख, सचिव सरोज दशपुते, सुरेखा महाले, डॉ. मीनल पलोड आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विजया भडके, मंदा वायले, भारती उगले, सीमा टावरी, इंदू कातकाडे, मंदाकिनी भागवत, रूपाली जाधव, कीर्ती बांगडिया, प्रज्ञा कुलकर्णी, संध्या परदेशी यांचा उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सहयोगिनी गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अनिता शहा, माधुरी महाजन यांनी केले.
असे आहेत पुरस्कारार्थी
इनरव्हील क्लब आॅफ जेन-नेक्ट नाशिक यांच्यातर्फे ज्ञानदानातून सजग नागरिक घडविण्याचे काम करणाºया व्ही. जे. कापडणीस, सविता बागुल, गणपत भोये, सुवर्णा कोथमिरे, दीपक उशीर, शैलेश शिंदे, एस. एल. अहिरे, एस. डी. महाले, ए. जी. पवार, मथुरा मोरे, के. आर. शेजवळ, चंद्रकांत अहिरे, एस. एच. गुंजाळ, बी.ए. गायकवाड, ओम शिरोडे, मुक्ता गायकर, अमित जगदाळे आदी शिक्षकांचा यावेळी नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Web Title: Teachers, award to women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.