शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे पडघम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:30 AM2017-09-26T01:30:36+5:302017-09-26T01:30:42+5:30
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विद्यमान सदस्याची मुदत जुलै २०१८ मध्ये संपुष्टात येत असल्याने तत्पूर्वीच निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी राबविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विद्यमान सदस्याची मुदत जुलै २०१८ मध्ये संपुष्टात येत असल्याने तत्पूर्वीच निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी राबविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सन २०१२ मध्ये झालेल्या या निवडणुकीत शिक्षक लोकशाही आघाडीत फूट पडल्यामुळे बहुरंगी लढतीत अपूर्व हिरे हे निवडून आले होते. पाच जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघावर वर्षानुवर्षे शिक्षक लोकशाही आघाडीचे वर्चस्व कायम राहिले. गेल्या निवडणुकीत मात्र प्रत्येक जिल्ह्याकडून उमेदवारीची मागणी होऊ लागल्याने प्रत्येकाने वेगळी चूल मांडल्यामुळे खºया अर्थाने ही निवडणूक गाजली होती. आता सहा वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला असून, त्यात प्रामुख्याने ६ नोव्हेंबर २०१७ पर्यंत नावनोंदणी करणाºया मतदारांनाच या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. येत्या २८ सप्टेंबरपासून मतदारांची प्रत्यक्षात नोंदणी सुरू करण्यात येणार असून, त्यात १ नोव्हेंबर २०१७ पूर्वी सहा वर्षांतील तीन वर्षे मतदाराने प्रत्यक्षात विद्यादानाचे काम केलेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय मतदार हा मतदारसंघातील रहिवासी असणे अनिवार्य आहे. मतदार ज्या शिक्षण संस्थेत विद्यादानाचे काम करतो त्या संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र मतदार नोंदणी अर्जासोबत जोडावे लागणार असून, त्यात मतदाराची संपूर्ण माहिती समाविष्ट असेल. नाशिक जिल्ह्णातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकाºयांकडे मतदार नोंदणी अर्ज दिले व स्वीकारले जातील. ६ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी सुरूच राहणार असून, २१ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २१ डिसेंबरपर्यंत या यादीवर हरकती नोंदविण्याची मुदत आहे. १९ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.