समाज घडवण्यात शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा

By admin | Published: September 21, 2016 12:21 AM2016-09-21T00:21:18+5:302016-09-21T00:22:40+5:30

गुलाबराव पाटील : आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन

Teachers' contribution to society becomes important | समाज घडवण्यात शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा

समाज घडवण्यात शिक्षकांचा वाटा महत्त्वाचा

Next

उपनगर : समाज घडवण्यात शिक्षकांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असतो. ज्ञानदानाकरिता संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या तळागाळातील शिक्षकांना समाजापुढे आणून त्यांचा सन्मान करणे ही खरोखरच गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
प्रभाग ३१ मधील शिवसेना प्रणीत विघ्नहर्ता मंडळाने आयोजित आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळ्याप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार योगेश घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, नीलेश चव्हाण, जयंत दिंडे, आशिष साबळे, महिला आघाडीच्या शामला दीक्षित, शोभा दोंदे, शुभांगी नांदगावकर, युवा सेनेचे सचिन मोगल, आदित्य बोरस्ते, योगेश बेलदार, प्रशांत काळे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ललित निकम, शैलेश पाटोळे, विनायक पाटील, प्रवेश नरजकर, अजित निखाडे, राजेंद्र परदेशी, कीर्ती अरगडे, शिला रमण, प्रतिभा मराठे, अश्विनी मुंढे, पुष्पा गौड, समता दास, ज्योती जाधव, वैजयंती जोशी, तृप्ती दुसाने आदिंसह ३५१ शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत अधिकारी व आभार धीरज शिंदे यांनी मानले. यावेळी आबासाहेब खामकर, सागर धर्माधिकारी, रामेश्वर निर्मळ, विशाल जमधडे, संजय निकम, नारायण परदेशी आदि उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: Teachers' contribution to society becomes important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.