मेहता हायस्कूलमध्ये मंगळवारी शिक्षक दरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:14 AM2021-02-07T04:14:26+5:302021-02-07T04:14:26+5:30
नाशिक जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी मंगळवारी (दि.९) शिक्षक दरबाराचे आयोजन करण्यात आले ...
नाशिक जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी मंगळवारी (दि.९) शिक्षक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
के.जे. मेहता हायस्कूलच्या शोभेंदू सभागृहात होणाऱ्या या शिक्षक दरबारात शिक्षक आमदार किशोर दराडे शिक्षकांचे अनेक प्रश्न जाणून घेणार असून त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती एनडीएसटीचे माजी अध्यक्ष मोहन चकोर यांनी दिली. या शिक्षक दरबारासाठी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर- वीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हस्कर, वेतनपथक अधिक्षक उदय देवरे, लेखाधिकारी संजय खडसे, सहायक शिक्षण संचालक पुष्पा पाटील आदी अधिकारी तसेच विविध शिक्षक शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.