फिट इंडिया अभियानांतर्गत शिक्षकांची सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:13 AM2020-12-29T04:13:28+5:302020-12-29T04:13:28+5:30
महावीर महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक सकाळी स्वतःच्या घरापासून सायकल चालवत तारवालानगर गाठले. तद्नंतर ९.३० वाजता मुख्य रॅलीला तारवालानगरपासून ...
महावीर महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक सकाळी स्वतःच्या घरापासून सायकल चालवत तारवालानगर गाठले. तद्नंतर ९.३० वाजता मुख्य रॅलीला तारवालानगरपासून सुरुवात करण्यात आली. रॅलीची सुरुवात श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या समन्वयिका, तसेच डॉ.प्रियंका झंवर यांच्या मार्गदर्शनाने झाली.
यावेळी इंजिनीअरिंगचे प्राचार्य नवनाथ पाळदे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य संभाजी सगरे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.अजय देशपांडे, रॅलीचे समनव्यक प्रा.तोष्णिल बोरस्ते, प्रा.संजय भामरे,राहुल बनकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. रॅलीत प्रा.पुष्पेंदू बिश्वास,रोशनी डोखळे, सागर खैरनार, स्वप्निल लोखंडे, अनुप सोनवणे, प्रा.बाजीराव शिरोळे, राजेंद्र पुरकर, मोनिका उगले, अश्विनी लोहकरे, नीलेश तुपे, संतोष वाबळे, नीलेश शेवाळे, पराग देसले, योगेश खैरनार, अपेक्षा पाटील, जीवन उफाडे, योगेश अहिरे, उन्मेष जाधव आदींनी सहभाग नोंदविला. आठ किलोमीटर नॉनस्टॉप सायकल चालवत डॉ.प्रियंका झंवर सर्वप्रथम महाविद्यालयात पोहोचल्या, तर गोपाळ घुगे द्वितीय, तर कैलास बुणगे तृतीय क्रमांकाने महाविद्यालयात पोहोचले.
(फोटो २८ महावीर)