ग्रामपंचायत निवडणूक मानधनापासून शिक्षक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:13 AM2021-03-07T04:13:38+5:302021-03-07T04:13:38+5:30
सिन्नर : तालुका मुख्याध्यापक संघ आणि माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने मागील महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन ...
सिन्नर : तालुका मुख्याध्यापक संघ आणि माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने मागील महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन मिळावे, यासंबंधीचे निवेदन नायब तहसीलदार ललिता साबळे यांना देण्यात आले.
तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक नुकतीच पार पडली. सदर निवडणूक कार्यासाठी तालुक्यातील बहुतेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती. त्या सर्वांनी निवडणुकीचे काम प्रामाणिकपणे पूर्ण केले होते. निवडणुकीनंतर काही तालुक्यांना सदर कामाचे मानधन मिळाले होते. परंतु, सिन्नर तालुक्यातील निवडणूककाळातील कर्मचा-यांना कोणत्याही प्रकारचे मानधन मिळाले नव्हते, म्हणून तहसीलदार राहुल कोताडे यांना महिनाभरापूर्वी मानधन मिळण्याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. त्यावर कार्यवाही न झाल्याने पुनश्च एकदा नायब तहसीलदार साबळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.बी. देशमुख, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आर.आर. महात्मे, फुले विद्यालयाचे प्राचार्य आर.ई. लोंढे, एस.जी. पब्लिक स्कूलचे प्राचार्य आर.बी. एरंडे, ब.ना. सारडा विद्यालयाचे प्राचार्य ए.व्ही. पवार, शिक्षक संघाचे कार्यवाह जे.जी. सय्यद, एस.एस. गाडेकर, आर.टी. गिरी, बी.आर. चव्हाण, एस.एस. राठोड, व्ही.व्ही. चव्हाण, जी.आर. वरखेडे आदी उपस्थित होते. एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटल्यानंतरदेखील अद्यापपर्यंत मानधन मिळाले नसल्याची कल्पना भ्रमणध्वनीवरून तहसीलदारांना करून देण्यात आल्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.बी. देशमुख यांनी सांगितले. तेव्हा येत्या आठवडाभरात मानधन देण्याचे आश्वासन तहसीलदार कोताडे यांनी दिले.
----------
सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ आणि माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने मागील महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन मिळावे, यासंबंधीचे निवेदन नायब तहसीलदार ललिता साबळे यांना देण्यात आले. (०६ सिन्नर १)
===Photopath===
060321\06nsk_16_06032021_13.jpg
===Caption===
०६ सिन्नर १