जिल्ह्यातील शिक्षकांना कोविड जबाबदारीतून कार्यमुक्त करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:58 PM2020-08-25T17:58:00+5:302020-08-25T17:59:11+5:30

पेठ : नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना मार्च महिन्यापासून कोविड-१९ च्या कामकाजात सहभागी करून घेण्यात आले असून, सध्या जिल्हाभर ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’अंतर्गत आॅनलाइन व आॅफलाइन अध्यापनप्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून प्राथमिक शिक्षकांना या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Teachers in the district should be relieved of their responsibilities | जिल्ह्यातील शिक्षकांना कोविड जबाबदारीतून कार्यमुक्त करावे

प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना निवेदन देताना अंबादास वाजे, प्रदीप शिंदे, धनराज वाणी, संजय भोर, प्रदीप पेखळे, किरण सोनवणे, साहेबराव अहिरे आदी.

Next
ठळक मुद्दे प्राथमिक शिक्षक संघ : जि. प. अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

पेठ : नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना मार्च महिन्यापासून कोविड-१९ च्या कामकाजात सहभागी करून घेण्यात आले असून, सध्या जिल्हाभर ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’अंतर्गत आॅनलाइन व आॅफलाइन अध्यापनप्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून प्राथमिक शिक्षकांना या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना निवेदन देण्यात आले. कोरोना संसर्गाने लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना राज्य व जिल्हा तपासणी नाका, कोविड सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत शिक्षकांनी या कामातही स्वत:ला झोकून दिले असून, जूनपासून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम सुरू झाल्याने शिक्षकांना विविध शैक्षणिक साहित्य, चित्रफिती व तत्सम ई -साहित्य तयार करून आॅनलाइन व आॅफलाइन अध्यापन करावे लागत असल्याने प्राथमिक शिक्षकांना कोविड-१९मधून कार्यमुक्त करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, प्रदीप शिंदे, धनराज वाणी, संजय भोर, प्रदीप पेखळे, किरण सोनवणे, साहेबराव अहिरे, प्रमोद क्षीरसागर, म .का. आहेर, दत्तात्रेय चौघुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Teachers in the district should be relieved of their responsibilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.