पेठच्या आरोग्य विभागास शिक्षकांनी दिली १५ लाखांची रुग्णवाहिका भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:10 AM2021-06-06T04:10:57+5:302021-06-06T04:10:57+5:30

पेठ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची झालेली धावपळ पाहून पेठ तालुक्यातील शिक्षकांनी प्रत्येकी दोन ...

Teachers donate Rs 15 lakh to Peth health department | पेठच्या आरोग्य विभागास शिक्षकांनी दिली १५ लाखांची रुग्णवाहिका भेट

पेठच्या आरोग्य विभागास शिक्षकांनी दिली १५ लाखांची रुग्णवाहिका भेट

Next

पेठ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची झालेली धावपळ पाहून पेठ तालुक्यातील शिक्षकांनी प्रत्येकी दोन हजारांची वर्गणी गाेळा करून १५ लाखांचा कोविड निधी अवघ्या एक महिन्यांत उभा केला. तालुक्यातील वाडी वस्तीवरील सामान्य जनतेला तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सर्व उपचाराच्या सुविधा असलेली फोर्स ट्रॅव्हलर कंपनीची रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वाहन भांडार संकलनाच्या व फोर्स कंपनीच्या उज्ज्वल फोर्स एजन्सी नाशिक यांच्या सहकार्याने शासनाच्या GEM पोर्टलवरील रास्त दरात खरेदी करून आरोग्य विभागाच्या स्वाधीन केली. यामुळे कोरोना कालावधीसह कायमस्वरूपी ही रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी उपलब्ध असणार आहे.

पेठ पंचायत समिती आवारात विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पेठचे आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले. यावेळी सभापती विलास अलबाड, उपसभापती, पुष्पा पवार, तुळशिराम वाघमारे, नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप अहेर, तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, अमित भुसावरे, गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, डॉ. अभिजीत नाईक, मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार, अनिल भडांगे, तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, गोकुळ झिरवाळ, नामदेव हलकंदर, गिरीश गावित, पुुंडलिक महाले, शिक्षक संघटना समन्वय समितीचे मनोहर टोपले, मोतीराम सहारे, आर. डी. शिंदे, राजेंद्र भोये, धनंजय चव्हाण, भारत भामरे, उत्तम चौधरी, संजय भोये, दिनकर डगळे, किरण नाठे, चंद्रशेखर पठाडे यांच्यासह पेठ तालुक्यातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक, बीआरसी कर्मचारी उपस्थित होते.

इन्फो...

शिक्षक समन्वय समितीचा गौरव

पेठसारख्या छोट्या व दुर्गम तालुक्यातील शिक्षकांनी १५ लाखांचा कोरोना निधी जमा करून रुग्णवाहिका भेट दिल्याने जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षक समन्वय समिती व गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी, लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी वैशाली वीर, नम्रता जगताप, सरोज जगताप, डॉ. योगेश मोरे, जी. पी. खैरनार, अंबादास पाटील वाहन भांडार संकलन आरोग्य विभाग आदी उपस्थित होते.

फोटो - ०५ पेठ १

पेठ तालुक्यातील शिक्षकांच्या मदतनिधीतून रुग्णवाहिका लोकार्पणप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, विलास अलबाड, पुष्पा पवार, डॉ. संदीप आहेर, संदीप भोसले, नम्रता जगताप, सरोज जगताप आदी उपस्थित होते.

===Photopath===

050621\05nsk_2_05062021_13.jpg

===Caption===

पेठ तालुक्यातील शिक्षकांच्या मदतनिधीतून रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जि.प. सदस्य भास्कर गावीत, विलास अलबाड, पुष्पा पवार, डॉ. संदिप आहेर, संदिप भोसले, नम्रता जगताप, सरोज जगताप आदी.

Web Title: Teachers donate Rs 15 lakh to Peth health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.