शिक्षकांनी केला आॅनलाइनचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:39 PM2020-06-17T22:39:00+5:302020-06-18T00:38:03+5:30
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत वेळापत्रक ठरवून दिले असून, शक्यतो पुढच्या महिन्यापासून शैक्षणिक सत्र सुरू होणार असले तरी, जिल्हा परिषदेच्या २१४ शिक्षकांनी मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिकविण्यास सुरुवात केली आहे, तर ६० शिक्षकांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिक्षणाचा श्रीगणेशा केला आहे.

स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ज्या शिक्षकांना शक्य आहे त्यांनी स्वयंप्रेरणेने आॅनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय कामकाज सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी वेळापत्रक ठरवून दिले असून, त्यानुसार निम्मे शैक्षणिक सत्र संपुष्टात येण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. जिल्हा परिषदेच्या शाळादेखील बंद असून, ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ते टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी पुढाकार घेऊन साधारणत: चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन शिक्षण सुरू केले आहे. या उपक्रमास पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीचे सहकार्य मिळाले असून, शिक्षकांच्या या स्वयंप्रेरणेचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिक्षण सभापती सुरेखा दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शिक्षण अधिकारी वैशाली वीर यांनी कौतुक केले आहे.
-------------------
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला गती
बागलाण १२, दिंडोरी १२१ इगतपुरी १, मालेगाव ५, नाशिक ५, निफाड १६, येवला ३० असे एकूण १९० शिक्षकांचा सहभाग आहे.
६० शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भ्रमणध्वनीचा ग्रुप करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना दररोज शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला गती प्राप्त झाली आहे.