शिक्षकांचे थकीत वेतन मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:35 AM2019-04-18T00:35:40+5:302019-04-18T00:36:00+5:30
सपकाळ नॉलेज हबच्या सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून थकीत असून, संबंधित शिक्षकांचे थकीत वेतन तत्काळ मिळावे, अशी मागणी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचतर्फे करण्यात आली आहे
नाशिक : सपकाळ नॉलेज हबच्या सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून थकीत असून, संबंधित शिक्षकांचे थकीत वेतन तत्काळ मिळावे, अशी मागणी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचतर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. यापूर्वी वारंवार निवेदने देऊनही विद्यापीठ याप्रकरणाकडे लक्ष देत नसल्याचा आरोपही शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचतर्फे करण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र कार्यालयात शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचातर्फे दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून सपकाळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील १२५ ते १५० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन जुलै २०१८ पासून थकीत आहे. याप्रकरणी वारंवार अर्ज देऊनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. वेतन न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाचे अध्यक्ष श्रीधर देशपांडे, मुकुंद दीक्षित, प्रा. डॉ. मिलिंद वाघ, अरुण धामणे, वासंती दीक्षित, सचिन मालेगावकर, प्रशांत निमये, गणेश शिंदे, प्रा. सचिन गाडेकर आदींनी इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
वेतन थकल्यामुळे शिक्षक व कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. पैशाअभावी शिक्षकांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, विमा व कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे या कर्मचाºयांचे कुटुंब रस्त्यावर येण्याची वेळ आली असून, कर्मचारी तणावात आले आहे. याप्रकरणी महाविद्यालय व विद्यापीठाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे.