शिक्षकांना करावी लागते पहारेदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:13 AM2021-02-14T04:13:59+5:302021-02-14T04:13:59+5:30
या विद्यालयात सकाळ व दुपारच्या सत्रात वर्ग सुरू असतात. दुपारची शाळा सुरू होतांना काही टवाळखोर शाळेच्या परिसरात येऊन धिंगाणा ...
या विद्यालयात सकाळ व दुपारच्या सत्रात वर्ग सुरू असतात. दुपारची शाळा सुरू होतांना काही टवाळखोर शाळेच्या परिसरात येऊन धिंगाणा घालणे, हुल्लडबाजी करणे असे उद्योग करून विद्यार्थी व शिक्षकांना त्रास होईल, असे कृत्य करतात. त्यामुळे सकाळची शाळा सुटणे व दुपारची सुरू होण्याच्या वेळी शाळेच्या आवारापासून रस्त्यावर ठिकठिकाणी उभे राहून शिक्षकांना पहारा देण्याची वेळ आली आहे. वीज केंद्राच्या सुरक्षा विभागाला याबाबत मुख्याध्यापक पी.एस. सांगळे यांनी टवाळखोरांबाबत तक्रार केल्याने सुरक्षा विभागाची गाडीही येऊन जाते. विद्यार्थी येण्याजाण्याच्या मार्गावर वीज कंपनीचे सुरक्षा रक्षकही तैनात असतात. मात्र हे टवाळखोर कुणालाही भीक घालत नाहीत. गर्दीच्यावेळी तीन-चार जण एकाच मोटारसायकलवर बसून सुसाट वेगाने चालवून स्टंटबाजी करायलाही ते घाबरत नाहीत. या टवाळखोरांचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी, अशी मागणी काही पालकांनी केली आहे.