शिक्षकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:33 PM2020-01-20T22:33:33+5:302020-01-21T00:19:20+5:30
केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि एनसीईआरटी यांच्या संयुक्त वतीने होत असलेल्या निष्ठा प्रशिक्षणाचा पाचवा टप्पा मुंगसे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व शिक्षकांच्या गुणवत्ता-वाढीसाठी तसेच अध्ययन अध्यापन पद्धती अधिक प्रभावी होण्यासाठी निष्ठा प्रशिक्षण घेण्यात आले.
दाभाडी : केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि एनसीईआरटी यांच्या संयुक्त वतीने होत असलेल्या निष्ठा प्रशिक्षणाचा पाचवा टप्पा मुंगसे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व शिक्षकांच्या गुणवत्ता-वाढीसाठी तसेच अध्ययन अध्यापन पद्धती अधिक प्रभावी होण्यासाठी निष्ठा प्रशिक्षण घेण्यात आले.
मालेगाव गटातून प्रतिटप्प्यात १५० शिक्षक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणाच्या पाचव्या टप्प्यात दाभाडी, सौंदाणे, सोनज, जळगाव, नि. पाटणे या केंद्रातील शिक्षकांनी १३ ते १८ जानेवारीपर्यंत प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणासाठी शिक्षण विस्ताराधिकारी आत्माराम अहिरे यांनी मालेगाव गटाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. विद्या प्राधिकरण नाशिकच्या डॉ. भारती बेलन या निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या. राज्यस्तरावर प्रशिक्षण घेतलेले प्रवीण शिंदे (इंग्रजी), चेतन निकम (गणित), नीलेश भामरे (भाषा) व विशाल मिसर (विज्ञान) या तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रप्रमुख साहेबराव बच्छाव, शिवाजी गुंजाळ, शोभा हिरे, सुनंदा पवार यांच्यासह दाभाडी, पाटणे, सौंदाणे, सोनज, जळगाव नि. केंद्रातील जिल्हा परिषद व शासकीय आश्रमशाळेतील दीडशे शिक्षकांनी आनंददायी वातावरणात प्रशिक्षण घेतले. समग्र शिक्षा अभियानचे महेंद्र पवार, रहीम कुरेशी, संतोष भांड यांनी नियोजन केले. प्रशिक्षणाच्या निष्पत्तीतून मिळालेल्या माहितीद्वारे रत्ना काकळीज व चंद्रभान पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले, तर सचिन शिंदे यांनी आभार मानले.