शिक्षकांनी तंत्रस्नेही बनणे गरजेचे : वायुनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:51 AM2019-07-25T00:51:06+5:302019-07-25T00:51:28+5:30
शिक्षकांनी बदलत्या काळाप्रमाणे अद्ययावत राहणे, ज्ञानामध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांची पिढी ही डिजिटल तंत्रज्ञानाचा लवकर स्वीकार करते. त्यामुळे शिक्षकांनीदेखील तंत्रस्नेही बनणे अत्यंत गरजेचे आहे,
नाशिक : शिक्षकांनी बदलत्या काळाप्रमाणे अद्ययावत राहणे, ज्ञानामध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांची पिढी ही डिजिटल तंत्रज्ञानाचा लवकर स्वीकार करते. त्यामुळे शिक्षकांनीदेखील तंत्रस्नेही बनणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.
नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक संस्थेच्या विविध शाळांतील शालांत परीक्षेतील व विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या प. सा. नाट्यगृहात संपन्न झालेल्या गुणगौरव समारंभाप्रसंगी डॉ. वायुनंदन बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. सूर्यकांत रहाळकर होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, चंद्रशेखर मुंडे, कार्यवाह राजेंद्र निकम, शिक्षक मंडळ अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उपाध्यक्ष दिलीप अहिरे, उत्सव समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड, कार्यकारी मंडळ सदस्य भास्करराव कोठावदे, विश्वास बोडके, वि. भा. देशपांडे, सरोजिनी तारापूरकर, श्रीकृष्ण शिरोडे, संस्था शिक्षणाधिकारी शैलेश पाटोळे, सहकार्यवाह सरिता देशपांडे, एकनाथ कडाळे, लक्ष्मण गंगाधर बदादे आदी उपस्थित होते .
यावेळी प्रा सूर्यकांत रहाळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षकांनी नवीन शिक्षण व्यवस्थेतील बदल लक्षात घेऊन प्रशिक्षण घेऊन स्वत:मध्ये बदल करणे काळाची गरज आहे. शिक्षकांनी व पालकांनी डिजिटल बनने गरजेचे आहे.
प्रास्ताविक राजेंद्र निकम यांनी केले. निवेदन उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रशांत केंदळे यांनी केले. यावेळी शैलेश पाटोळे, मधुवंती देशपांडे, सुनंदा कुलकर्णी, यशश्री रत्नपारखी व शालेय पदाधिकारी, शिक्षक कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.