कोविड सेवेसाठी शिक्षकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:35+5:302021-03-31T04:14:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शिक्षकांचे अद्याप पूर्णपणे लसीकरण झालेले नाही. तसेच शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शिक्षकांचे अद्याप पूर्णपणे लसीकरण झालेले नाही. तसेच शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू असल्याने अध्यापन कार्यही सुरू आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांना कोविड १९ संदर्भातील कोणतीही कामे देऊ नये अशी मागणी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य समन्वयक आर. डी. निकम, निलेश ठाकूर, सहसमन्वयक प्रदीपसिंह पाटील यांनी केली आहे.
कोविड १९ संदर्भातील कामाचा शिक्षकांना कोणताही अनुभव नाही. असे असतानाही जळगावमध्ये कोविड सेंटरवर शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप करीत या नियुक्त्या तत्काळ रद्द करण्याची मागणीही महाराष्ट्र शिक्षक संघाकडून करण्यात आली आहे. संघटनेच्या जळगावमधील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक जिल्हा प्रशासनास या संदर्भात निवेदन देत शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी केली असून नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनीही या मागणीला समर्थन देत अशा प्रकारे शिक्षकांच्या कोविड सेवेसाठी नियुक्तीला विरोध दर्शविला आहे.