शिक्षकांनी केली वाडी-वस्तीवरील कोरोनाविषयक जनजागृती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:15 AM2021-05-14T04:15:06+5:302021-05-14T04:15:06+5:30

पेठ : कोरोना प्रादुर्भाव व ग्रामीण भागात लसीकरण व उपचारासंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पेठ तालुक्यातील अतिशय ...

Teachers raise awareness about corona in Wadi-Vasti! | शिक्षकांनी केली वाडी-वस्तीवरील कोरोनाविषयक जनजागृती !

शिक्षकांनी केली वाडी-वस्तीवरील कोरोनाविषयक जनजागृती !

googlenewsNext

पेठ : कोरोना प्रादुर्भाव व ग्रामीण भागात लसीकरण व उपचारासंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पेठ तालुक्यातील अतिशय दुर्गम गाव-पाड्यावर आदिवासी विकास विभागांतर्गत वांगणी येथील आश्रमशाळा शिक्षकांकडून जनप्रबोधन मोहीम राबविण्यात आली. अनु. आश्रमशाळा, वांगणी येथील माध्यमिक शिक्षकांनी तालुक्यातील तोंडवळ, चाफ्याचा पाडा, हट्टीपाडा, राजबरी, खोकरतळे, वांगणी, बोरीचीबारी आदी आदिवासी पाड्यांवर जाऊन, प्रत्यक्ष कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधून त्यांच्यामध्ये लसीकरणाविषयी असलेली भीती दूर करून देण्याचा प्रयत्न करत नियमित तोंडाला मास्क वापरणे, वारंवार साबणाने हात धुणे, सामाजिक अंतर ठेवून सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे या विषयी महत्त्व सांगत प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

-------------

तोंडवळ (ता. पेठ) येथे लसीकरण जनजागृती करताना वांगणी आश्रमशाळेचे शिक्षक. (१३ पेठ १)

===Photopath===

130521\13nsk_12_13052021_13.jpg

===Caption===

१३ पेठ १

Web Title: Teachers raise awareness about corona in Wadi-Vasti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.