आजपासून शिक्षकांची शाळा; विद्यार्थी घरूनच ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 06:16 PM2021-06-13T18:16:44+5:302021-06-13T18:17:30+5:30

पेठ : मागील वर्षापासून सलग दुसऱ्या वर्षी शाळेचा पहिला दिवस घंटा न वाजताच साजरा होणार असून, विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसले तरी शिक्षक मात्र शक्य त्या उपाययोजना व कोरोनाची काळजी घेत सोमवारपासून (दि.१४) पेठ तालुक्यातील वाडी-वस्त्यांवरच्या बालकांपर्यंत पोहोचणार आहेत. याही वर्षी शाळा बंद, शिक्षण सुरू हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात यंदाही विद्यार्थी प्रवेशोत्सवाला मुकणार असून, काही ठिकाणी ऑनलाइन तर काही ठिकाणी ऑफलाइन अध्यापनाचे धडे गिरवावे लागणार आहेत.

Teacher's school from today; Students online from home | आजपासून शिक्षकांची शाळा; विद्यार्थी घरूनच ऑनलाइन

आजपासून शिक्षकांची शाळा; विद्यार्थी घरूनच ऑनलाइन

Next
ठळक मुद्देपेठ तालुक्यात आजपासून शाळा बंद, शिक्षण सुरू !

पेठ : मागील वर्षापासून सलग दुसऱ्या वर्षी शाळेचा पहिला दिवस घंटा न वाजताच साजरा होणार असून, विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसले तरी शिक्षक मात्र शक्य त्या उपाययोजना व कोरोनाची काळजी घेत सोमवारपासून (दि.१४) पेठ तालुक्यातील वाडी-वस्त्यांवरच्या बालकांपर्यंत पोहोचणार आहेत. याही वर्षी शाळा बंद, शिक्षण सुरू हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात यंदाही विद्यार्थी प्रवेशोत्सवाला मुकणार असून, काही ठिकाणी ऑनलाइन तर काही ठिकाणी ऑफलाइन अध्यापनाचे धडे गिरवावे लागणार आहेत.

शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा दिवस असतो. आयुष्यातील प्रत्येक वळणावर प्रत्येकाला हा दिवस प्रेरणा देणारा ठरावा म्हणून काही वर्षांपासून शाळा प्रवेशोत्सव साजरा करून नवागतांचे स्वागत करण्याची परंपरा मागील वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे खंडित झाली आहे. यंदाही कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा बंदच राहणार आहेत. प्रत्यक्षात १५ जूनपासून शालेय वर्ष सुरू होणार असले तरी शिक्षकांना सोमवारी (दि.१४) शाळेत हजेरी लावून साफसफाईसह अन्य कामे उरकावी लागणार आहेत. दरम्यान, पेठ तालुका हा दऱ्याखोऱ्यात वसलेला असल्याने कोणत्याही संपर्क यंत्रणेचा फारसा प्रभाव पडत नाही. शिवाय पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने महागडे भ्रमणध्वनी किंवा त्यासाठी लागणारे रिचार्ज करणे शक्य नसल्याने तालुक्यात कोणत्याही प्रकारे ऑनलाइन शिक्षण देणे शक्य होत नसल्याने शिक्षकांनी शासनाच्या कोविड नियमांचे पालन करून पटनोंदणीसह अध्यापनाचे नियोजन केले आहे.

शिक्षकांची कोरोना चाचणी
ऑनलाइन किंवा ऑफलाइन पध्दतीने शालेय अध्यापनाचे कामकाज सुरू करण्यात येणार असल्याने पेठ तालुक्यातील शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पेठ येथील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारपासून स्वॅब संकलनाचे काम सुरू असून, कोरोना टेस्टसह आवश्यक सुरक्षा साहित्यांचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार असल्याने आदिवासी भागातील वाडी-वस्त्यांवरील बालकांचे शैक्षणिक नुकसान यामुळे टळणार आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्या व उर्वरित शिक्षकांनी कोरोना चाचणी करून घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

लसीकरणाबाबत करणार जनजागृती
पेठ तालुक्यातील कोरोना लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर उदासीनता दिसून येत असल्याने एकूण उद्दिष्टांच्या तुलनेत लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे सोमवारपासून सर्व शिक्षक शालेय अध्यापनासोबत आगामी काळात नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी जनजागृती करणार आहेत. वाडी-वस्त्यांवरील नागरिकांमध्ये लसीकरण व कोरोनासंदर्भात पसरलेले गैरसमज, अफवा व भीती घालविण्यासाठी शिक्षक पुढाकार घेणार असून, समाजमाध्यमे, प्रत्यक्ष भेटीच्या साह्याने कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे.

पेठ तालुका स्थिती
एकूण शाळा संख्या - १८९
एकूण विद्यार्थी संख्या - १३,५०४
एकूण शिक्षक संख्या - ५६६
ऑनलाइन शिक्षण घेणारे - ००
ऑफलाइन शिक्षण घेणारे - १३,३१५
 

Web Title: Teacher's school from today; Students online from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.