टीचर्स सोसायटी करणार कर्ज व्याजदारात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:15 AM2021-01-03T04:15:23+5:302021-01-03T04:15:23+5:30
संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व्याजात घट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयावर निर्णय घेण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात मासिक सभा आयोजित ...
संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व्याजात घट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयावर निर्णय घेण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. माहे जानेवारी, २०२१ पासून संस्थेने ८ टक्क्यांनुसार कर्ज वाटप करण्याचा आणि सभासद मासिक वर्गणी रु. २००० कपात करण्याच्या निर्णयाला संचालक मंडळाच्या सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. यापूर्वी संस्थेचे कर्ज व्याजदर ९.५० टक्के, तसेच मासिक वर्गणी रु. १,५०० कपात करण्यात येत होती. या धोरणाची अंमलबजावणी माहे जानेवारी, २०२१ पासूनच सुरुवात करण्याचे आदेश संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब तांबे यांनी यावेळी दिले. संस्थेचे संस्थापक दौलतराव मोगल, कार्यवाह नानासाहेब खुळे, उपाध्यक्ष विलास पाटील, राजेंद्र मिठे, राजेंद्र गडाख, मच्छिंद्र आढाव, बाळासाहेब धूम, विनायक काकुळते, रामेश्वर मोगल, माधव शिंदे, सुनील तासकर, मंगला बोरणारे, सीमा हांडगे, एकनाथ खैरनार, वसंत निरगुडे, संतोष भालेराव, वैभव गडाख आदी उपस्थित होते.