वेतन मिळत नसल्यामुळे शिक्षक त्रस्त
By admin | Published: May 9, 2017 01:28 AM2017-05-09T01:28:11+5:302017-05-09T01:28:21+5:30
मेशी : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमधून शिक्षकांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मेशी : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमधून जिल्ह्यातील माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन आणि काढलेल्या कर्जाचे पैसे मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
सध्या लग्नसराई सुरू आहे त्यामुळे अधिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे ज्यांचे वेतन या बँकेतून होते असे कर्मचारी वेठीस धरले गेले आहेत.
मुलांच्या शिक्षणासाठी खर्च कसा काय करणार, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. सगळे हप्ते थकले आहेत. त्यामुळे आता यामधून कसा मार्ग काढावा याचीच चर्चा होत
आहे.
दर महिन्याच्या १ तारखेला होणारे वेतन आता मिळत नसल्यामुळे
एक-दोन दिवसात तोडगा काढावा, अशी मागणी देवळा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष
डी. आर. अहेर, टीडीएफ तालुका अध्यक्ष एम. जी. शिरसाठ, बी. बी. मोरे, अनिल अहेर, एस. टी. पाटील, व्ही. डी. आहिरे, जी. टी. पगार, एस. एस. देवरे, ई. एम. सावळा, ए. के. सावंत, एम. एन. अहेर, ठोके
आदींसह असंख्य कर्मचाऱ्यांनी केली आहे.