विनाअनुदानित कर्मचारी संघटनेचे शिक्षक आमदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:40 PM2020-07-09T17:40:38+5:302020-07-09T17:41:12+5:30

डांगसौदाणे : कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक व कर्मचारी संघटनेचे घर बैठे धरणे आंदोलन सुरू असताना वेबिनारद्वारे शिक्षक आमदारांशी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली.

Teachers of unaided workers' union meet MLAs | विनाअनुदानित कर्मचारी संघटनेचे शिक्षक आमदारांना साकडे

विनाअनुदानित कर्मचारी संघटनेचे शिक्षक आमदारांना साकडे

Next

डांगसौदाणे : कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक व कर्मचारी संघटनेचे घर बैठे धरणे आंदोलन सुरू असताना वेबिनारद्वारे शिक्षक आमदारांशी चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली.
राज्यातील कायम विनाअनुदानित कर्मचारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर दि.१९ जूनपासून धरणे आंदोलन सुरू आहे. शासनाने २००१ पासुन राज्याच्या प्रवित्र शिक्षणव्यवस्थेत कायम-विना-अनुदान हे जाचक व अन्यायकारक धोरण राबविल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरु आहे. संघटनेच्या माध्यमातून वेबिनार घेण्यात आले. त्यात राज्य अध्यक्ष संजय जाधव व डॉ. दिपक धोटे यांनी शिक्षक आमदार विक्रम काळे, सुधीर तांबे, दत्तात्रेय सावंत, श्रीकांत देशपांडे आदींशी चर्चा करून अनुदानाची व्यथा मांडली. त्यांनी शिक्षणमंत्री उदय सांवत यांच्याशी चर्चा करून प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिले.
वेबिनारमधील चर्चेत नाशिक जिल्हा अध्यक्ष संजय आहेर, दरेकर, गांगुर्डे, माडवडे, नाडेकर आदिंनी भाग घेतला व जोपर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत घर बैठे आंदोलन चालूच राहील असा निर्धार व्यक्त केला.

Web Title: Teachers of unaided workers' union meet MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक